
कर्नाटक सरकारने विधानसभेतील स्वा. सावरकरांचा फोटो काढून राहुल गांधीच्या सावरकरविरोधी भूमिकेला भूमिकेला मूर्त रूप दिले आहे. खरतंर राहुल गांधी (Rahul Gandhi) देशभरात फिरत असताना सावरकरांच्या (Veer Savarkar) विरोधी भूमिका घेत असतात. कर्नाटक सरकारने हे निंदनीय कृत्य केले आहे. हे सर्व होत असताना मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) झोपी गेले आहेत, अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
(हेही वाचा – Kurla Bus Accident प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा !)
संजय राऊत सावरकरांविषयी का बोलत नाहीत ?
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) पुढे म्हणाले की, सावरकारांच्या मुद्द्यावरुन संजय राऊत सकाळी का बोलले नाहीत ? ते काँग्रेसच्या कळपातून बाहेर का पडले नाही ? त्यांच्यासोबत राहिल्याने जनतेने ठाकरेंना धुवून काढले आहे, तरी ते सुधारत नाहीत का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती पाहिजे आहे. ट्रिपल इंजिन सरकार काम करेल, केंद्र, राज्य व आता स्थानिक स्वराज्य संस्थांतही आम्ही चांगले काम करू, पुढील 3 महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता काँग्रेसचे पानिपत करेल. मारकडवाडीचे मी उदाहरण दिले आहे. ईव्हीएमने कधी त्यांना साथ दिली, तर कधी आम्हाला. त्यांना साथ दिली तर काही बोलत नाही. आम्हाला साथ दिली तर ईव्हीएम मध्ये गडबड बोलतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community