Uddhav Thackeray यांच्या मागणीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सपशेल दुर्लक्ष; मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला नाहीच

140
UBT Shiv Sena ला उभे होण्यापूर्वीच पाडले, ताकदच संपवली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने!

ज्याचा जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला नको. भाजपबरोबरच्या अनुभवाची पुनरावृत्ती नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच मेळाव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली. परंतु शरद पवार आणि नाना पटोले यांनी मेळाव्यात जाहीर भाषणे करत मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा जाहीर करण्याच्या उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्यातच मतभेद जाहीरपणे दिसून आले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याला नकार दिला.

(हेही वाचा – इंडी आघाडी म्हणजे बलात्कारी बचाव आघाडी; Prem Shukla यांचा हल्लाबोल)

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने महाविकास आघाडीचा पहिला एकत्रित मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये झाला. या मेळाव्याचे यजमानपद शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी उद्घाटनाचे भाषण केले. या उद्घाटनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी सुरुवातीलाच महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली; मात्र घटक पक्षांनी त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची मागणी वारंवार रेटली

शरद पवार आणि पृथ्वीराज बाबांनी जाहीर केलेला उमेदवार आम्ही मान्य करून त्याला पाठिंबा देऊ, असे सांगितले. भाजपबरोबरची 20–25 वर्षांची युती होती. परंतु, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला त्यांनी लादला. त्यांच्याबरोबरचा अनुभव कटू होता. तसे महाविकास आघाडीच्या बाबतीत व्हायला नको, असे सांगत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर ठेवली. त्या वेळी नाना पटोले व्यासपिठावर हजार नव्हते; परंतु नाना व्यासपीठावर आल्यानंतर देखील भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची मागणी पुढे रेटली.

आपले ध्येय महायुतीचे सरकार घालवायचे आणि महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे. ते सरकार आणल्यानंतर मुख्यमंत्री आपण ठरवू शकतो. विधानसभा निवडणुकीनंतर सगळे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री ठरवतील, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली.

शरद पवारांनी आपल्या भाषणात तर त्या विषयाला स्पर्श देखील केला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या मागणीला पवारांनी बगल दिली. एकूणच उद्धव ठाकरेंच्या मागणीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सपशेल दुर्लक्ष केल्याने ठाकरेंची (Uddhav Thackeray) पुढची वाटचाल महाविकास आघाडीत कशी राहील, याकडे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.