Uddhav Thackeray : आघाडीच्या बैठकीला राऊत एकटेच का? उद्धव ठाकरेंचा इतर नेत्यांवर भरवसा नाही काय

आघाडीसोबतच्या बैठकांना राऊत यांच्याशिवाय शिवसेना उबाठाकडून कोणत्याही नेत्याची उपस्थिती नसल्याने उद्धव ठाकरे यांचा राऊत व्यतिरिक्त अन्य कुणावर विश्वास नाही की राऊत यांना आपल्यापेक्षा कुणा नेत्याला मोठे व्हायला द्यायचे नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

298
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?
Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?

राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षासह इतर पक्षांना सोबत घेऊन आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु असून या आघाडीच्या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांचे अनेक नेते उपस्थित रहात असतानाच शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाकडून केवळ संजय राऊत हे एकमेव उपस्थित राहतात. आघाडीसोबतच्या बैठकांना राऊत यांच्याशिवाय शिवसेना उबाठाकडून कोणत्याही नेत्याची उपस्थिती नसल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राऊत व्यतिरिक्त अन्य कुणावर विश्वास नाही की राऊत यांना आपल्यापेक्षा कुणा नेत्याला मोठे व्हायला द्यायचे नाही असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Uddhav Thackeray)

भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) बनवली जात असून या इंडी आघाडीतूनही (I.N.D.I. Alliance) एक एक पक्ष बाहेर पडत आहेत. त्यातच राज्यात या आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) या पक्षांची आघाडीसह जागा वाटपांचीही चर्चा सुरु आहे. या आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेऊन त्यांनाही जागा सोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या या तिन्ही पक्षांच्या आघाडीसंदर्भातील आणि जागा वाटपा संदर्भातील काही बैठकांना शिवसेना उबाठाकडून (Shiv Sena UBT) केवळ संजय राऊत हेच उपस्थित होते. आजवर झालेल्या काही बैठकांना काँग्रेसकडून नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित असतात. परंतु शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) पक्षाकडून केवळ राऊत यांचीच उपस्थिती हेच आता शिवसेनेची सर्व सुत्रे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) संजय राऊत यांच्या हाती दिल्याचे स्पष्ट होत आहे. (Uddhav Thackeray)

मुळात अशाप्रकारच्या बैठकांना इतर पक्षांचे दोन ते तीन नेते उपस्थित राहत असताना उबाठाकडूनही नेते उपस्थित असणे आवश्यक असते. परंतु संजय राऊत हे कुणाला पुढे येऊ देत नाही, किंवा त्यांचा इतर नेत्यांवर विश्वास नाही किंबहुना ते पक्षातील सहकाऱ्यांना बुध्दीवान समजत नाही, असाच होत आहे. आपल्याशिवाय पक्षात कुणी बोलू नये हाच त्यांचा प्रयत्न असतो आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विश्वास त्यांनी संपादन केल्यामुळे त्यांचाही संजय राऊत यांच्याशिवाय इतर कोणत्याही नेत्यांवर विश्वास असल्याचे दिसून येत नाही. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Road Safety : रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करून आयुष्य सुरक्षित ठेवावे, परिवहन आयुक्तांचे आवाहन)

राऊतांनीच भरले उद्धव ठाकरेंचे कान

आज संजय राऊत हे कुणाला बोलायला देत नसून मी म्हणजेच शिवसेना आणि मी सांगेन तीच पूर्व दिशा अशाप्रकारे वागत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मी सांगेन तेच मान्य करतील असा एक संदेश ते कायम इतर पक्षातील नेत्यांना आणि आपल्या पक्षातील नेत्यांनाही देत असतात. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू सहकारी म्हणून आमदार मिलिंद नार्वेकर हे आहेत, आणि दुसरे विश्वासू सहकारी हे खासदार अनिल देसाई हे आहेत. त्यानंतर तिसरे विश्वासू सहकारी हे अनिल परब हे आहेत. परंतु या तिघांपैंकी कुणालाही संजय राऊत सोबत घेऊन आघाडीतील नेत्यांशी चर्चा करत नाही. आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेही त्यांना राऊत योबत या तिघांपैंकी एकाने जावे अशाप्रकारचे निर्देश देत नाही. त्यामुळे राऊतांनीच मी एकटा सर्व सांभाळेन, अन्य कुणाची गरज नाही अशाप्रकारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कान भरले आहेत, असेही बोलले जात आहे. (Uddhav Thackeray)

शिवसेना उबाठा नेत्याच्या म्हणण्यानुसार, उद्धवसाहेब (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री बनले आणि आपल्याला संजयमुळे मुख्यमंत्री बनता आले अशाप्रकारचे साहेबांची भावना आहे. आता तर त्यांनी त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने दाखवली आहेत. परंतु जेलमध्ये जाऊन आल्यानंतरही राऊत हे ज्याप्रकारे भाजपला अंगावर घेऊन टीका करत आहेत, ते पाहता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे खुश आहेत. खुद्द रश्मी वहिनीसुध्दा त्यांच्यावर खुश आहे. आज शिवसेना उबाठा पक्षाचे सर्वेसर्वा हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असले तरी संजय राऊत हेच असल्याचे चित्र निर्माण केले आहे. राऊत हे एकमेव या बैठकीला जात असल्याने त्याठिकाणी नक्की काय बोलले, पक्षाची काय भूमिका मांडली हे पक्षातील इतर नेत्यांना कळत नाही. पण तेच जर इतर नेते सोबत असले तरी राऊत तिथे काय बोलले आणि उद्धव (Uddhav Thackeray) साहेबांना त्यांनी काय सांगितले हेही समोर येऊ शकते. त्यामुळे राऊतांना आज अति आत्मविश्वास असून जर आघाडीची बोलणी फिस्कटल्यास यालाही राऊतच जबाबदार असतील असे बोलले जात आहे. या माध्यमातून राऊत हे केवळ पक्षाची नव्हे तर स्वत:ची ताकद आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचेच म्हणणे शिवसेना उबाठामधील नेत्यांचे म्हणणे आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.