उद्धव ठाकरेंच्या काळात आयटीआयची जागा दिली Urdu Bhavan साठी; भाजपाची आयुक्तांकडे ‘ही’ मागणी

143
उद्धव ठाकरेंच्या काळात आयटीआयची जागा दिली Urdu Bhavan साठी; भाजपाची आयुक्तांकडे 'ही' मागणी
उद्धव ठाकरेंच्या काळात आयटीआयची जागा दिली Urdu Bhavan साठी; भाजपाची आयुक्तांकडे 'ही' मागणी

भायखळा येथील ज्या जागेवर ऊर्दू भाषा भवन उभारण्यात येणार आहे, त्या प्रशिक्षण केंद्रावर आयटीआय केंद्र उभारण्यात येणार होते. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सरकारच्या काळात त्या भूखंडावरचे आयटीआय केंद्राचे आरक्षण रद्द करून अचानक ऊर्दू भाषा भवनला मान्यता देण्यात आली. येथे ऊर्दू भाषा भवन (Urdu Bhavan) न बांधता आयटीआय उभारा, अशी मागणी भाजपाच्या वतीने आयटीआयकडे करण्यात आली आहे. दहा आठवड्यांत त्यासाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हक्काच्या आयटीआयच्या (Industrial training institute, ITI) जागेवर घाईने ऊर्दू प्रशिक्षण केंद्र बांधण्याची गरज काय आहे, असे प्रश्न भाजपा नेते नितेश राणे यांनी उपस्थित केले आहेत.

(हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन संसदेसमोरच्या भाषणात काय म्हणाला?)

काय आहे प्रकरण ?

भायखळा (Byculla) येथील सी.एस. क्रमांक १९०८ हा भूखंड महापालिकेने २०११ मध्ये लोअर परेल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना ३० वर्षे मक्ता कराराने दिला होता. या भूखंडावर बेघरांसाठी निवारा असे आरक्षण मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१ च्या आराखड्यात होते. त्यामुळे सदर ठिकाणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यास परवानगी मिळू शकली नाही. महाराष्ट्र शासनाच्या साहाय्यक संचालक कौशल्य विकास विभागामार्फत हे आरक्षण बदलण्यासाठी नगर विकास विभागाकडे रितसर प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने विकास नियंत्रण नियमावली आराखडा २०३४ मध्ये सदर भूखंडावरील आरक्षणात बदल करून ते शैक्षणिक आरक्षण असे करण्यात आले. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी भूखंडावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था बांधण्यासाठी रितसर प्रस्ताव तयार करून विविध शासकीय स्तरावरील मान्यता घेण्यास सुरुवात केली. कोरोनामुळे सर्व प्रशासकीय कामे २०२० ते २०२२ या काळात ठप्प झाली होती. याच कालावधीत राज्यात व महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती. त्या काळात उर्दू भाषा भवनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिलेला मक्ता करार कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता रद्द करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ऊर्दू भाषा भवन मातोश्रीमध्ये उभारा – भाजपा नेते नितेश राणे

ज्या जागेवर ऊर्दू भाषा भवन उभारण्यात येणार आहे. त्या प्रशिक्षण केंद्रावर आयटीआय केंद्र उभारण्यात येणार होतं. पण आयटीआय केंद्राचं आरक्षण रद्द करून अचानक ऊर्दू भाषा भवनला मान्यता देण्यात आली. दहा आठवड्यात त्यासाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हक्काच्या आयटीआयच्या जागेवर घाईने ऊर्दू प्रशिक्षण केंद्र बांधण्याची गरज काय आहे ? ऊर्दू भाषा भवन उभारायचंच असेल तर मातोश्री टू तयार होत आहे. तिथेच उभारा, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.