विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC-NET च्या अभ्यासक्रमातही बदल केले जाणार आहेत. यूजीसी आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७ मधील बदलानंतर आता या अभ्यासक्रमामध्ये बदल केला जाणार आहे.
UGC चे अध्यक्ष प्रोफेसर एम. जगदीश कुमार यांनी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीनंतर बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम आणि समग्र शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली आहेत. उच्च शिक्षणात होत असलेल्या बदलांच्या अनुषंगाने UGC-NETचा अभ्यासक्रमही अद्ययावत केला जाईल, असा निर्णय यूजीसी आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
(हेही वाचा – ICC: ट्रान्सजेंडर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘नो एन्ट्री’; ICCकडून महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर)
विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या नियुक्तीसाठी UGC-NET च्या अभ्यासक्रमातही बदल केले जाणार आहेत. यूजीसी आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अभ्यासक्रम अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
युजीसी लवकरच विविध विषयांतील अभ्यासक्रम तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत तज्ज्ञांची एक समिती स्थापन करणार असून, नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यावर त्यापूर्वी उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल. UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. पुढील महिन्यात UGC-NET परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर २०२४ मध्ये UGC-NETचे पहिले सत्र १० ते २१ जूनदरम्यान होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community