मध्य प्रदेशातील मुसळधार पावसाने उज्जैनमध्ये (Ujjain Mahakal Temple) मोठी दुर्घटना घडली आहे. महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळ बांधलेली भिंत चिखलामुळे कोसळली आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेरिटेज वास्तू म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या महाकाल मंदिराजवळील महाराज वाडा शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.
(हेही वाचा-Akshay Shinde Encounter : …तर हे एन्काऊंटरच घडले नसते; माजी पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती)
या दुर्घटनेत जयसिंगपुरा येथे राहणारे फरहीन (वय वर्ष २२) आणि शिवशक्ती नगर येथील अजय (वय वर्ष २७) यांचा मृत्यू झाला. तर, शारदाबाई (वय वर्ष ४०) आणि रुही (वय वर्ष ३) या जखमी झाल्या आहेत. त्यांना इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव (Chief Minister Mohan Yadav) यांनी उज्जैन दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं म्हटलं आहे. (Ujjain Mahakal Temple)
(हेही वाचा-CM Eknath Shinde यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया; शिर्डीच्या दौऱ्यासह अनेक कार्यक्रम रद्द)
मुख्यमंत्री म्हणाले, ‘उज्जैनमधील महाराजवाडा शाळेजवळ भिंत कोसळून दोन स्थानिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बाबा महाकाल मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दु:खाच्या प्रसंगी, मी शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो.’ (Ujjain Mahakal Temple)
मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी ४२.६ मिमि पाऊस
हवामान खात्याने इंदूर-उज्जैन, जबलपूर आणि ग्वाल्हेर विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मते, मध्य प्रदेशात आतापर्यंत सरासरी ४२.६ मिमि पाऊस झाला आहे. हवेच्या वरच्या भागात चक्रीवादळ तयार झाले असून, त्यामुळे उत्तर मध्य प्रदेशात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. विशेषत: इंदूर, उज्जैन, रेवा, ग्वाल्हेर आणि सागरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (Ujjain Mahakal Temple)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community