- ऋजुता लुकतुके
मॉरिस गराज (Morris Garage) ही युकेची कार उत्पादन कंपनी भारतात आपली एमजी ३ ही हॅचबॅक कार (hatchback car) लाँच करत आहे आणि कंपनीच्या इतर हाय-एंड कारपेक्षा या कारची किंमतही कमी आहे. (MG 3)
मॉरिस गराज (Morris Garage) कंपनीच्या हेक्टर आणि ग्लिस्टर या एसयुव्ही कार भारतात चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. त्या यशानंतर भारतीय बाजारपेठेची गरज ओळखून तयार केलेली एम जी ३ ही हॅचबॅक गाडी आता कंपनी भारतात लाँच करत आहे. युरोपमध्ये ही कार आधीपासूनच वापरात आहे आणि युकेमध्ये ती लोकप्रियही ठरलीय. (MG 3)
टोयोटा यारिस आणि कोर्सा या गाड्यांशी एनजी ३ ची स्पर्धा असेल. पण, दोन गाड्यांच्या तुलनेत जास्त जागा एमजी ३ (MG 3) मध्ये तुम्हाला उपलब्ध असेल. इंटिरिअरही प्रशस्त आहे. या गाडीत ३२८ लीटरची बूटस्पेस तुम्हाला मिळते. सिटी कारचा हिशोब करता ही सर्वोत्तम आहे. (MG 3)
गाडीमध्ये असलेला ८.३ इंचांचा डिस्प्ले तुम्ही ॲपल कार युनिट किंवा मोबाईल मिररिंगच्या माध्यमातून मोबाईललाही जोडू शकता. त्यामुळे मोबाईलमधील सगळी ॲप तुम्ही इथं वापरू शकाल. (MG 3)
OMG! The Surprising New MG3 has arrived. Find your local MG dealer and book a test drive at https://t.co/ri4rRIrwVU #MG #MG3 #newmg3 #supermini #newcar pic.twitter.com/3bjoyrPbKi
— MG Motor UK (@MGmotor) September 3, 2018
(हेही वाचा – Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या ‘त्या’ कंत्राटदाराला सुमारे सव्वा कोटींचा दंड)
पेट्रोल इंधनावर चालणाऱ्या गाडीत १४९८ सीसी क्षमतेचं इंजिन आहे. तर चार सिलिंडर आहेत. १.५ लीटर इंजिनमधून १०६ अश्वशक्ती इतकी ऊर्जा निर्माण होते. शहरात चालवायला ही गाडी योग्य आहे. पण, खड्डा किंवा अडथळा आल्यास गाडी थोडा विचित्र गचका देते, असंही गाडी चालवणाऱ्यांनी म्हटलं आहे. (MG 3)
सहा रंगांमध्ये भारतात ही कार लाँच केली जात आहे आणि तिची किंमत ६ लाखांपासून सुरू होईल. टाटा अल्ट्रोझ आणि ह्युंदे आय१० या गाड्यांशी तिची स्पर्धा असेल. (MG 3)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community