Umed Mahalaxmi Saras : ‘उमेद’ ने दिले ग्रामीण महिलांना उद्योजकतेचे बळ

29
Umed Mahalaxmi Saras : 'उमेद' ने दिले ग्रामीण महिलांना उद्योजकतेचे बळ

‘उमेद अभियान’ अंतर्गत आयोजित ‘महालक्ष्मी सरस’ या भव्य प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन पुन्हा एकदा ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान वांद्रे येथील बीकेसी-एमएमआरडीए मैदानात आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण उद्योजक आणि महिला बचत गटांच्या उत्पादने खरेदीसाठी हे प्रदर्शन मोठी संधी ठरले आहे. ‘उमेद’ मुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेचे बळ मिळाले असून महिलांच्या व्यवसायाला नव्या संधी निर्माण झाल्या आहेत (Umed Mahalaxmi Saras)

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे आणि राज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक भव्य झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर भेट देत विविध उत्पादने खरेदी केली. (Umed Mahalaxmi Saras)

(हेही वाचा – सभागृहाच्या कामकाजातील उपस्थिती संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकवेल; विधान परिषदेच्या उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे प्रतिपादन)

‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी उत्साहात गर्दी करत भरभरून प्रतिसाद दिला. विविध हस्तकला, घरगुती उत्पादने, पारंपरिक वस्त्रप्रकार आणि मसाल्यांचे पदार्थ हे ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले असून मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. (Umed Mahalaxmi Saras)

खरेदीसोबतच फूड कोर्टलाही प्रचंड प्रतिसाद मिळत असून, रात्री उशिरापर्यंत नागरिक विविध स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता, या प्रदर्शनाने मुंबईतील खरेदीप्रेमींमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Umed Mahalaxmi Saras)

(हेही वाचा – शिवसेना उबाठा गटाला आणखी एक धक्का! अखेर Rajan Salvi यांचा राजीनामा)

प्रदर्शनात ५०० हून अधिक स्टॉल्स असून, हातमागाच्या वस्तू, घरगुती उत्पादने, विविध मसाले, शोपीस यांसारख्या नवनवीन वस्तू येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांना येथे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या १०० हून अधिक खाद्यपदार्थ स्टॉल्स वर रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधीही मिळत आहे. (Umed Mahalaxmi Saras)

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला उद्योजिका आणि स्वयं सहायता गटांनी सहभाग घेतला आहे. ‘उमेद अभियान’ हे केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता, महिलांसाठी ‘उमेद मार्ट’ नावाचे ऑनलाइन व्यासपीठही उपलब्ध करून देत आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागातील महिला घरबसल्या आपली उत्पादने विकू शकतात, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक बळकट होत आहे. (Umed Mahalaxmi Saras)

(हेही वाचा – अखेर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्या परतीचा महिना ठरला)

”उमेद अभियान’ अंतर्गत हजारो महिलांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळत असून, त्यांना आर्थिक स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी केले आहे केले आहे.  (Umed Mahalaxmi Saras)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.