UN Child marriage Report: भारतात अजूनही बालविवाहाची संख्या मोठी; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आकडेवारी

यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 2030 अजेंडा उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी तातडीने कृती करण्याचे आवाहन केले आहे. लिंग समानता, महिलांवरील हिंसाचार आणि हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या समस्या हाताळण्यात जग मागे पडल्याचे त्या सांगतात.

38
UN Child marriage Report: भारतात अजूनही बालविवाहाची संख्या मोठी; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आकडेवारी
UN Child marriage Report: भारतात अजूनही बालविवाहाची संख्या मोठी; संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून समोर आली आकडेवारी

भारतातील 20 कोटीहून अधिक महिलांचे बालवयात लग्न (Child marriage) झाल्यांचे संयुक्त राष्ट्रसंघांच्या अहवालातून (United Nations reports) समोर आले आहे. मात्र जागतिक स्तरावर, अंदाजे 64 दशलक्ष मुली आणि महिलांचे वय 18 वर्षापूर्वी लग्न झाले आहे, यापैकी एक तृतीयांश बालविवाह (One third child marriages in India) प्रकरण हे फक्त भारतातच घडतात. अशी गंभीर माहिती या अहवालातून समोर आली आहे.   (UN Child marriage Report)

मिळालेल्या माहितीनुसार, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2024 (Sustainable Development Goals 2024 Report) च्या अहवालानुसार, प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होते, तर 25 वर्षापूर्वी लग्न करणाऱ्यांची संख्या चारपैकी एक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून गेल्या काही वर्षांत 68 कोटी बालविवाह रोखण्यात आले आहेत. (UN Child marriage Report)

(हेही वाचा – पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा अशक्य: Pune Porsche car Accident वर Raj Thackeray यांची अमेरिकेतून टीका)

संयुक्त राष्ट्रांनी जग मागे पडल्याची खंत केली व्यक्त 

सरकारतर्फे मोठ्या प्रमाणावर बालविवाह रोकण्यासाठी मोहीम राबवल्या जातात. मात्र एवढ्या प्रगतीनंतरही लिंग समानतेत जग मागे पडल्याची खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महिलांना अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.  (UN Child marriage Report)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.