२१ डिसेंबर World Meditation Day म्हणून घोषित

287
२१ डिसेंबर World Meditation Day म्हणून घोषित
२१ डिसेंबर World Meditation Day म्हणून घोषित

दि. २१ डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ (World Meditation Day ) म्हणून साजरा करावा, असा लिश्टनस्टाईन या देशाने मांडलेला आणि भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दि. ६ डिसेंबर रोजी एकमाताने मंजूर केला आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश (Parvathaneni Harish) यांनी दिली.

( हेही वाचा : विधानसभा अध्यक्षांनी असा निर्णय दिला की, सर्वोच्च न्यायालय अजून विचारच करतेय; Jayant Patil यांची कोपरखळी

ध्यानधारणा ही प्राचीन काळापासून विकसित झाली आहे. आजच्या आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. लिश्टनस्टाईनने मांडलेल्या ठरावाला भारत, बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड, लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनॅको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया या देशांनी अनुमोदन दिले आहे. (World Meditation Day )

यासंदर्भात पर्वतनेनी हरीश म्हणाले की, “दि. २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस (World Meditation Day )म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. ‘वसुधैव कुटुंबकम् ’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे, असे भारताला वाटते. २०१४ साली भारताने पुढाकार घेऊन जगभरात २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ (International Yoga Day) म्हणून साजरा व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जागतिक योग दिन ही गेल्या दहा वर्षांत जागतिक चळवळ बनली आहे. जगभरातील लोक योगासनांचे धडे घेत आहे. तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यातच आता जागतिक ध्यान दिवस (World Meditation Day )जाहिर करण्यात आला आहे”, असे ही हरीश (Parvathaneni Harish) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.