UN Report : जगात ७४ कोटी जनता उपासमारीचे बळी; २०३० पर्यंत काय होणार परिस्थिती?

148

जगात अन्नाविना उपासमार होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. जगात सुमारे 74 कोटी लोक उपासमारीचे बळी असल्याचे UN च्या नवीन अहवालात समोर आले आहे. म्हणजेच त्यांना अन्न अजिबात मिळाले नाही.
UN च्या ‘द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2022 रिपोर्ट’ नुसार, 2019 नंतर लोकांचा भुकेशी संघर्ष झपाट्याने वाढला आहे. 2019 मध्ये, जगातील 618 दशलक्ष (61.8 कोटी) लोकांना उपासमारीचा सामना करावा लागला. म्हणजेच केवळ 3 वर्षात एक वेळचे अन्न मिळत नाही, असे 12.2 कोटी लोक वाढले आहेत.

याचे कारण म्हणजे कोविड-19 महामारी, हवामान बदल आणि रशिया-युक्रेन युद्ध. अहवालानुसार, उपासमारीची स्थिती अशीच राहिली तर 2030 पर्यंत 600 दशलक्ष (60 कोटी) लोक कुपोषणाचे बळी होतील. अहवालात असेही म्हटले आहे की, गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये जगातील 11.3% लोकसंख्येला (सुमारे 90 कोटी लोकांना) पुरेसे अन्न मिळाले नाही.

तीनपैकी एक रिकाम्या पोटी

दरम्यान, दर तीनपैकी एका व्यक्तीला रिकाम्या पोटी झोपण्याची वेळ आली. सोप्या शब्दांत सांगायचे तर, 240 कोटी लोकांना किंवा जगाच्या लोकसंख्येच्या 29.6% लोकांना अन्नाचा पुरवठा होऊ शकत नाही. याशिवाय 2021 मध्ये जगातील 310 कोटी लोकांना म्हणजेच 42% लोकसंख्येला पोषक आहार मिळालेला नाही.

45 दशलक्ष मुले कुपोषणग्रस्त

UN च्या स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन वर्ल्ड रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, 2022 मध्ये 5 वर्षाखालील 4.5 कोटी मुले कुपोषणाचे बळी ठरले. त्याचवेळी 14.8 कोटी मुलांची वाढ आणि विकास कमी प्रमाणात झाला. ही मुले अतिशय बारीक आणि अशक्त झाली आहेत. या मुलांचे वजन त्यांच्या वयानुसार कमी आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा गंभीर परिणाम

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय चलनवाढ वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करता येत नाही. खरं तर, रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, सूर्यफूल तेल आणि खतांपासून कृषी उत्पादनांचे प्रमुख निर्यातदार आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक पुरवठा साखळी प्रभावित झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.