Unani College: रायगड जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होणार राज्याचे पहिले शासकीय युनानी महाविद्यालय 

134

रायगड जिल्ह्यातील (Raigad District) म्हसळा तालुक्यातील सावर येथे पहिलेवहिले शासकीय युनानी महाविद्यालय (First Govt Unani College at Savar) उभारले जाणार आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) मानकानुसार नवीन युनानी महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान एक वर्षापासून कार्यरत रुग्णालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील रुग्णालये आवश्यक त्या रुग्णखाटांसह तीन वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण विभागाकडे देत मान्यता दिली आहे.

राज्यात युनानी पदवी अभ्यासक्रमाची (BUMS) सात महाविद्यालये आहेत. त्यापैकी तीन शासन अनुदानित असून चार खासगी विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. या सात महाविद्यालयांमध्ये ४२० एवढी विद्यार्थीक्षमता आहे. राज्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे पहिले शासकीय युनानी महाविद्यालय (Government Unani College) आणि त्यालाच संलग्रित १०० रुग्णखाटा क्षमतेचे रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय यंदा मार्च महिन्यात घेण्यात आला. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील सावर या गावात उभे राहणार आहे.

या रुग्णालयाच्या स्थापनेसाठी ‘ना’ हरकत प्रमाणपत्र’ देण्याची विनंती वैद्यकीय शिक्षण व आयुषच्या आयुक्तांनी केली होती. मात्र एमसीआयने आखून दिलेल्या नियमानुसार असे पुनानी महाविद्यालय मुरू करण्यासाठी किमान एक वर्षापासून कार्यरत रुग्णालय असणे आवश्यक आहे. या अटीची पूर्तता करण्यासाठी आता रायगड जिल्ह्यातील कार्यरत रुग्णालये तात्पुरत्या स्वरूपात किमान तीन वर्षे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागासाठी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील पहिल्या शासकीय युनानी महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

(हेही वाचा – ‘सूर्यकिरण’ या भारत-नेपाळ संयुक्त लष्करी सरावासाठी Indian Army चे पथक रवाना)

गेल्या १४ मार्चच्या शासन निर्णयानुसार महसूल विभागाने रायगड जिल्ह्यातील सावर गावाजवळील पाच एकर जागा मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याशिवाय १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि १०० रुग्णाखाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी ३३८.३५ कोटी रुपयांचा निधीही देण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी १९७ कोटी रुपये उभारणीसाठी ANI MEDITE आणि पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती, वेतन आदींसाठी १४० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले होते. तसेच पाच वर्षांनंतर दर वधीं खर्चासाठी ३२.७३ कोटी रुपये मान्य करण्यात आले होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.