- सचिन धानजी,मुंबई
मुंबईतील रेल्वे स्थानक तसेच सार्वजनिक वाहन तळाच्या परिसरात बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहने आता उचलण्यात येणार असून ही वाहने उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने वाहतूक पोलिसांना हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्सची सेवा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर पार्किंग केलेल्या गाड्या उचलण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असून आता यासाठी महापालिकेच्यावतीने तिजोरीतून पैसा खर्च करत टोव्हिंग व्हॅन्स मनुष्यबळासह पुरवली जाणार आहे. (Unauthorized Car Parking)
मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे ह्या विभागांत बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना खेचून आणण्यासाठी ३६ नग हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्सची सेवा पाच वर्षाच्या कालावधीकरिता भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. हे करार करार एप्रिल २०२४ मध्ये संपुष्टात आल्यांनतर आता आणखी दोन वर्षांसाठी नवीन करार करण्यात येत आहे. ही सेवा भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे. पुढील दोन वर्षांकरता ही सेवा घेण्यात आली असून या सेवांसाठी महापालिकेच्यावतीने पावणे अकरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी जय मल्हार हायरिंग सर्व्हिसेस या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. (Unauthorized Car Parking)
(हेही वाचा – Konkan Rain Alert: कोकणात जोरदार पावसाची हजेरी; एनडीआरएफची टीम तैनात!)
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्सची सेवा भाड्याने पुरविण्यात येत आहे. या हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्सच्या मार्फत बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या वाहनांवर कार्यवाही प्रभावीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन सोबत आवश्यक कामगार पुरविण्यात येतील. या हायड्रोलिक टोव्हिंग व्हॅन्स मार्फत रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या वाहनांवर होणाऱ्या अतिक्रमण निर्मुलन कार्यवाहीचे प्रभावीरित्या अंमलबजावणी होण्यासाठी कामांची दैनंदिन देखरेख ही वाहतूक पोलिस विभागामार्फत केली जाणार आहे. (Unauthorized Car Parking)
एका बाजुला मुंबईतील बेवारस वाहने उचण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून टोव्हिंग व्हॅनची सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाच्यावतीने प्रयत्न केला जात आहे, मात्र, दुसरीकडे मुंबईत बेकायदा रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनाच भाडेतत्त्वावर या वाहनांची सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या टोव्हिंग व्हॅनच्या आधारे वाहतूक पोलिस हे रस्त्यावरील बेकायदा वाहने उचलून नेत संबंधित वाहन चालकांकडून दंडाची रक्कम वसूल करणार आहे आणि ही दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा केली जाणार आहे, पण यासाठीच्या वाहनांच्या सुविधांसाठी महापालिकेच्या तिजोरीत हात घातला जात आहे. (Unauthorized Car Parking)
कोणत्या भागात होणार कारवाई
- वाहन तळाच्या तसेच रेल्वे स्थानकाच्या ५०० मीटर परिक्षेत्रात रस्त्यावर बेकायदेशीपणे उभ्या केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना खेचून आणण्यात येणार आहे.
- रस्त्याच्या कडेला अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या बेवारस वाहने खेचून आणण्यासाठी
- मुंबईतील एम. के. रोड, एस.व्ही. रोड, एल.बी.एस. रोड व न्यू लिंक रोड ह्या चार मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे उभी केलेली वाहने खेचून आणण्यासाठी (Unauthorized Car Parking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community