वांद्रे पूर्व (Bandra) येथील भारतनगर भागात असलेल्या अनधिकृत बांधकामावर या एसआरएच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात या परिसरात जेसीबी दाखल झाला असून अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात 178 घरांना एसआरएकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. असे असूनही प्रशासनाने अनधिकृत बांधकांमांवर कारवाई सुरु केल्यानंतर उबाठाचे (UBT Shivsena) नवनिर्वाचित आमदार वरूण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांना त्या ठिकाणी भेट देत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचा – Mumbai Metro: मेट्रोचा वेग वाढला! मुंबईकरांचा वेळ वाचणार, मेट्रो ताशी ८० किमी वेगाने धावणार)
तुम्हाला मुंबई गिळायची आहे का? असा प्रश्न उपस्थित करत वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी अनधिकृत बांधकामांचे समर्थन केले आहे.
या ठिकाणी आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील भेट दिली. या माध्यमातून प्रशासन दादागिरी करत आहे. मुंबईतील जमिनीबाबत कायद्यानुसार ही कारवाई होत नसून केवळ मुंबईतील जागा गिळायची आहे. त्यातूनच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. (Bandra)
वांद्रे येथे ज्या ठिकाणी कारवाई सुरु आहे, तेथे बांगलादेशी मुसलमान (Bangladeshi Infiltrators) घुसखोरांची झोपडपट्टी आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरु असलेल्या कारवाईला विरोध म्हणजे झोपडपट्टीतील बांगलादेशी मुसलमानांना अभय देण्यासारखे आहे, अशी टीका उबाठा नेत्यांवर होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community