Pavngadh : पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटविले ; तब्बल सात तास सुरु होती कारवाई

पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवले आहे.हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

343
Pavngadh : पावनगडावरील अनधिकृत मदरसे हटविले ; तब्बल सात तास सुरु होती कारवाई

कोल्हापुरातील(Kolhapur) पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं आहे. पावनगडावरील अनधिकृत मदरसे (Unauthorized madrssas) प्रशासनानं हटवले आहे. किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. (Pavngadh)

पावनगडावरील अतिक्रमण कारवाई शुक्रवारी ( ५डिसेंबर) मध्यरात्री दोन वाजता सुरु केली आहे. मध्यरात्री सुरु झालेली ही कारवाई तब्बल सात तास चालली ही कारवाई शनिवारी सकाळी नऊ वाजता संपली. किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटविण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुखसह महत्वाचे अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहे.

(हेही वाचा : Chinese electric product ban: सावधान! चिनी इलेक्ट्रिक वस्तू विकल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेसह दोन लाखांचा दंड)

मदरशाच्या अतिक्रमणावरची कारवाई स्वागतार्ह – आमदार बच्चू कडू 

या कारवाई बाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मदरशाच्या अतिक्रमणावरची कारवाई स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली तर पुढे बोलताना ते म्हणाले की गडाच्या ठिकाणी असे अनधिकृत मदरसे असणे चुकीचे आहे असेही ते प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.