Bmc Ward Office लाच अनधिकृत स्टॉलचा विळखा; लोकार्पणाच्या फलकाभोवतीच स्टॉल्सचे अतिक्रमण

हापालिकेच्या या इमारतीचे (Bmc Ward Office) लोकार्पण झाले होते, तेव्हा याठिकाणी एकही स्टॉल नव्हता, परंतु आता फलकाच्या बाजुलाच स्टॉल्स लावण्यात आले असून या स्टॉल्सचे भंगार सामान या फलकाच्या समोर ठेवून हा फलकही झाकून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

2441

मुंबई महापालिकेच्यावतीने (Bmc Ward Office) अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केला जात असला तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या प्रशासकीय कार्यालयालाच अर्थात वॉर्ड ऑफिसलाच अनधिकृत बांधकामांनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे.  विशेष म्हणजे हे अतिक्रमण करताना संबंधित वॉर्ड आफिसच्या लोकार्पणाचा फलकाच्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल्स लावून हा बोर्डही अडवून टाकला आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने जेव्हा लोकार्पणाचा फलक लावला होता, त्यावेळी याठिकाणी एकही स्टॉल नव्हते, परंतु आता बारा ते तेरा वर्षांत या फलकाच्या आसपासच स्टॉल्स लावून विभाग कार्यालयालाच अतिक्रमणाचा विळखा पडत असतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना डोळ्यासमोरचे अतिक्रमण दिसत नाही त्यांना इतर ठिकाणचे अतिक्रमण कसे दिसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

bmc1

मुंबई महापालिकेच्या आर मध्य विभागाचे कार्यालयाची (Bmc Ward Office) इमारत चंदावरकर लेन आणि एस व्ही रोड च्या जंक्शनला असून या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर २०११मध्ये तत्कालिन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले. तत्कालिन महापौर श्रध्दा जाधव, उपमहापौर शैलजा गिरकर यांच्यासह तत्कालिन आमदार गोपाळ शेट्टी, आमदार विनोद तावडे आणि आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह तत्कालिन सभागृहनेते सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या उपस्थित या इमारतीचे लोकार्पण  पार पडले होते. त्यानुसार या इमारतीच्या लोकार्पणाचा फलक हा या इमारतीच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आला होता.

(हेही वाचा रत्नागिरीत Love Jihad साठी आता अल्पवयीन मुसलमान मुलाचा वापर; धक्कादायक प्रकरण उघडीस)

bmc3 1

कालांतराने या इमारतीच्या या प्रवेशद्वाराचा वापर कमी करून अन्य प्रवेश मार्गाचा वापर केला गेला आणि मग हा प्रवेशमार्ग बंद करण्यात आला. परंतु सन २०११मध्ये लोकार्पणाचा लावलेला हा फलकच आता धुळखात आणि अतिक्रमणाच्या विळख्यात पडल्याचे पहायला मिळत आहे.

bmc4

महापालिकेच्या या इमारतीचे (Bmc Ward Office) लोकार्पण झाले होते, तेव्हा याठिकाणी एकही स्टॉल नव्हता, परंतु आता फलकाच्या बाजुलाच स्टॉल्स लावण्यात आले असून या स्टॉल्सचे भंगार सामान या फलकाच्या समोर ठेवून हा फलकही झाकून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

आर मध्य विभाग कार्यालयाच्या मागील बाजुस कुंपणालाच खेटून अनेक स्टॉल्स लावण्यात आलेले असून या स्टॉल्सवर महापालिकेने  तेव्हाच योग्यप्रकारे कारवाई न केल्याने तब्बल २०११ पासून हे स्टॉल्स आजही उभे आहे. महापालिकेच्या विभाग कार्यालयालाच अनधिकृत बांधकामांनी विळखा घातलेला असतानाच महापालिका प्रशासन किमान  आपल्या कार्यालयाचा विळखा सोडून लोकार्पणाचा फलक तरी अडगळीतून स्पष्ट दिसेल अशाप्रकारची कार्यवाही करेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.