धक्कादायक! बीकेसीकडील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला! 

सावध झालेल्या मजुरांनी लगेचच तेथून खाली उतरण्यास सुरुवात केली. त्यामुळे यातील बरेचसे मजूर सुरक्षित राहिले, मात्र आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले.

मुंबईच्या बीकेसी येथील निर्माणाधीन उड्डाणपूल शुक्रवारी, १६ सप्टेंबर रोजी पहाटे कोसळला. या उड्डाणपुलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पुलावर काम करत होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल कोसळायला सुरुवात झाली. हा पूल कोसळत असताना त्यावर २० -२५ मजूर काम करत होते. सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही, मात्र १० मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गर्डर निखळला आणि पूल कोसळला!

या पुलाला जोडलेला एक गर्डर निखळून खाली पडला. त्यामुळे बाकीचा पूल कोसळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी तात्काळ सावध झालेल्या मजुरांनी लगेचच तेथून खाली उतरण्यास सुरुवात केली. त्यामुळे यातील बरेचसे मजूर सुरक्षित राहिले, मात्र आठ ते दहा मजूर हे पूलासोबतच खाली कोसळले. हे सर्व जण थेट बाजूच्या नाल्यात पडल्याने जखमी झाले आहेत. या मजुरांच्या दुखापतीचे स्वरुपत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. त्यांनी जखमींना नाल्यातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या येथील पुलाच्या ढिगाऱ्याखाली कुणीही मजूर अडकल्याची माहिती नाही. मात्र हा उड्डाणपूल कसा पडला, त्याचे कारण अद्याप समजलेले नाही.

(हेही वाचा : शिल्पा म्हणाली, कुंद्राची कंपनी माहीत, पण त्याचे ‘उद्योग’ नाही!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here