अनेक पदव्या घेऊनही लाखो तरुण नोक-यांच्या रांगेतच आहेत, ही बाब लक्षात घेऊन आता विद्यार्थ्यांना शालेय वयापासूनच रोजगारपूरक करिअर कसे निवडावे, यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. त्यादृष्टीने स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ठराविक कालावधीचा अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषदेच्या स्तरावर सुरु करण्यात आली आहे.
वर्षभरापासून स्टार्स उपक्रम शाळांमध्ये सुरु करण्यात आला आहे. त्यासाठी एससीईआरटीला जागतिक बॅंकेने सहकार्य केले आहे. या प्रकल्पाचा पुढचा भाग म्हणून आता विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन, व्यावसायिक शिक्षण असा अभ्यासक्रम दिला जाणार आहे. हा अभ्यासक्रम नेमका कसा असावा, त्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असाव्यात, तो दररोज किती कालावधीत शिकवला जावा, तो ऑफलाइन असावा की ऑनलाइन अशा सर्वांगीण मुद्द्यांवर विचार करण्यासाठी राज्यभरातील अधिव्याख्याता प्रशासन अधिकारी, सहाय्यक आयुक्त, समुपदेशक, शिक्षक, प्राचार्यांची तीन दिवसीय कार्यशाळा एससीईआरटी घेणार आहे. या कार्यशाळेत व्यावसायिक अभ्यासक्रमाचा घटक संच ठरवला जाईल. कार्यशाळा घेण्याची जबाबदारी अमरावती येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे देण्यात आली आहे.
( हेही वाचा: आता ST तिकिटाचेही पैसे द्या ऑनलाईन )
Join Our WhatsApp Community