- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर (Dadar) पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपुलाखाली जागेत पोलिसांकरता बिट चौकीची व्यवस्था करण्यात आली. परंतु उत्सव काळासह इतर वेळीही दादर पश्चिम भागांत खरेदी करायला गर्दी केली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा पाकीट मारी तसेच अन्य प्रकार घडत असल्याने या पोलिस चौकीची कल्पना नागरिकांना होत नाही. त्यामुळे या बिट पोलिस चौकीचे प्रवेशद्वारे पुलाच्या दोन्ही बाजूला खुले केले जावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
(हेही वाचा – Kangana Ranaut : ….तरीही भाजपच्या ‘क्वीन’ने काँग्रेसच्या महाराजाला हरविले!)
दादर (Dadar) पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील केशवसुत उड्डाणपुलाखाली सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या शेजारील जागा शिवाजी पार्क पोलिस ठाणे अंतर्गत बिट चौकीची जागा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पोलिस बिट चौकी असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना या बिट चौकीची माहितीच होत नाही. पुलाच्या स्थानकाच्या बाजूला बिट चौकीचा प्रवेशद्वार असून पुलाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे दुकानाच्या बाजूच्या दिशेने मोठ्याप्रमाणात वर्दळ असल्याने नागरिकांना या बिट चौकीची माहिती होत नाही. त्यामुळे दुकानाच्या बाजूने या बिट चौकीचा प्रवेशद्वार खुला केला जावा अशी मागणी केली जात आहे.
(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबईत यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव)
पोलिस बिट चौकीचे प्रवेशद्वार दोन्ही बाजूला असणे आवश्यक असून दुकानाच्या बाजूला काही घटना घडल्यास पोलिसांनी वर्दी देण्यास तिथे जावे लागते आणि त्यानंतर पोलिस संपूर्ण गाळ्याला वळसा घालून येतात. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बिट चौकीचे दरवाजे खुले केल्यास येथील नागरिकांना पोलिसांची मदत वेळीच घेता येतात तसेच पोलिसही योग्य वेळी घटनेच्या ठिकाणी पोहोचू शकतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. (Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community