महाराष्ट्रातील स्वराज्याची राजधानी रायगडसहित महाराष्ट्रातील इतर 14 किल्ले तसेच, कोकणातील कातळ शिल्पांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्याकरता युनेस्कोला महाराष्ट्र राज्य पुरातत्व खाते एक प्रस्ताव पाठवणार आहेत. आता या प्रस्तावासाठी तज्ज्ञांकडून पुरातत्व खात्याने निविदा मागवल्या आहेत.
प्रस्तावाला युनेस्कोने स्वीकारले
पुरातत्व खात्यातून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील रायगड, राजगडसहित 14 किल्ले तसेच महाराष्ट्र, गोव्यातील कातळ शिल्पांना युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा द्यावा, असा प्रयत्न सुरु आहे. सध्या राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावाला युनेस्कोने तत्वत: स्वीकारले आहे. मात्र ही सर्व ठिकाणे जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी कशी योग्य आहेत? त्याचा विस्तृत प्रस्ताव द्यावा लागतो.
( हेही वाचा: चीनच्या कुरापत्या सुरुच! पुलानंतर आता सीमेजवळ उभारले मोबाईल टाॅवर )
प्रस्तावात असलेली कातळ शिल्पे
महाराष्ट्र – कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी
गोवा – फणसईमाळ येथील कातळशिल्प
प्रस्तावात असलेले किल्ले
रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग (कुलाबा), सुवर्णदुर्ग, खांदेरी.