ऋजुता लुकतुके
देशातील मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक युनियन बँकेने गृहकर्ज आणि चारचाकी तसेच दुचाकींवरील कर्जावर काही ग्राहकांसाठी प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सवलत ठराविक कालावधीसाठी आहे. ठराविक लोकच याचा फायदा घेऊ शकणार आहेत. बँकेच्या अटी काय आहेत ते पाहूया.
(हेही वाचा – PM Modi On China : ब्रिक्समध्ये चीनच्या राष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा खडे बोल सुनावले)
शंभर टक्के प्रक्रिया शुल्क माफीसाठी पहिली अट असेल ती नवीन कर्जाची. दुसरे म्हणजे, तुमचा क्रेडिट स्कोअर ७००च्या वर हवा. आणि हे कर्ज १६ ऑगस्ट ते १५ नोव्हेंबर दरम्यान घेतलेलं पाहिजे. पहिली नवीन कर्जाची अट गृह कर्जाच्या बाबतीत शिथील करण्यात आली आहे. म्हणजे, इतर बँकांकडून घेतलेलं कर्ज युनियन बँकेत हस्तांतरित करायचं असेल तरीही प्रक्रिया शुल्क माफ असेल.
रिझर्व्ह बँकेनं रेपो दर जैसे थे ठेवल्यानंतर युनियन बँकेनं आपल्या कर्जवाटप धोरणात केलेला हा महत्त्वाचा बदल आहे. कर्जाच्या क्षेत्रात हा मोठा निर्णय मानला जाईल. कारण, एकूण कर्जाच्या रकमेवर ०.५ टक्के इतकं प्रक्रिया शुल्क साधारणपणे आकारलं जातं. त्यावर अतिरिक्त जीएसटीही भरावा लागतो. म्हणजे १ लाखाच्या कर्जावर ५०० रुपये इतकं प्रक्रिया शुल्क द्यावं लागतं. आणि कर्जाच्या प्रमाणात शुल्क वाढतही जातं. पण, ते भरायला न लागणं ही ग्राहकांसाठी मोठी सवलत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत इतर बँका प्रक्रिया शुल्काविषयी काय धोरण आखतात हे बघावं लागणार आहे.
युनियन बँक ही कर्जाच्या बाबतीत स्पर्धात्मक दर ठेवणारी बँक म्हणून ओळखली जाते. विविध प्रकारच्या कर्जावर युनियन बँकेचे दर ८.७ टक्क्यांपासून सुरू होतात.
हेही पहा –