कोरोना काळानंतर अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद वाढवल्या दिसून येत आहेत. कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रातील त्रृटी दिसून आल्याने 2022-2023 आणि आता 2023-2024 या वर्षातही आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद वाढवली आहे. परिचारिका महाविद्यालये, तसेच तंत्रस्नेही संशोधन या दोन प्रमुख मुद्द्यांवर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. परंतु या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचा हिरमोड झाल्याची टीका वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.
देशात १५७ वैद्यकीय महाविद्यालये उभारली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी, 1 फेब्रुवारी रोजी केली. नवीन परिचारिका महाविद्यालयांची उभारणी करण्याआधी जुन्या मोडकळीस आलेल्या परिचारिका महाविद्यालयांसाठी तरतूद करणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया परिचारिका संघटनेच्या अधिका-यांनी व्यक्त केली. जुन्या परिचारिका महाविद्यालयाच्या डागडुजीबाबत केंद्र तसेच राज्य सरकारकडूनही काहीच अपेक्षित हालचाली नसल्याबाबत परिचारिका संघटनांनी खेद व्यक्त केला.
(हेही वाचा Union Budget : २०२३ च्या अर्थसंकल्पातील २३ महत्त्वाच्या घोषणा!)
जोखीमेच्या आजारांच्या उपचारांसाठी योजना जाहीर होणे अपेक्षित होते
मुंबईतील केईएम या पालिका रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता तसेच खार येथील हिंदूजा रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी नव्याने उभारली जाणारी परिचारिका रुग्णालये सरकारी रुग्णालयांशी संलग्न असल्यास रुग्ण सेवेचा भार कमी होईल, अशी आशा व्यक्त केली. यंदाचे बजेट चार हजार कोटींनी वाढले आहे. आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांना रुग्ण सेवेचा लाभ मिळण्यासाठी विविध आर्थिक योजनांचा लाभ देणे आवश्यक होते. विविध आजारांच्या उपचारांसाठी सर्वसामान्यांना महागडे उपचार परवडत नाही. जोखीमेच्या आजारांच्या उपचारांसाठी योजना जाहीर करणे गरजेचे होते, असेही डॉ. सुपे म्हणाले.
अनॅमियाच्या उपचारांसाठी सर्वच भागांत सेलची स्थापना होणे आवश्यक
अनेमियाच्या उपचारांसाठी ग्रामीण भागांत सीकर सेल उभारला जात आहे. परंतु सर्वसामान्यांसाठी अनॅमियाच्या उपचारांसाठी सर्वच भागांत सेलची स्थापना होणे आवश्यक आहे, असे मत डॉ. सुपे यांनी मांडले. संशोधनासाठी आयसीएमआरच्या प्रयोगशाळा वापरल्या गेल्या तर निश्चितच संशोधनाला गती मिळेल. मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वैद्यकीय संशोधनासाठी होत आहे, ही प्रशंसनीय बाब आहे, असेही डॉ. सुपे म्हणाले.
Join Our WhatsApp Community