२३ जुलै रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये नव्या कररचनेची घोषणा करून अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पेन्शनची मर्यादाही १५ हजारांवरून २५ हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
याशिवाय नव्या कररचनेत ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नव्या करप्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांचा १७५०० रुपयांचा फायदा होईल, असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.
कशी आहे नवीन कररचना
- ० ते ३ लाख उत्पन्न – ० टक्के कर
- ३ ते ७ लाख उत्पन्न – ५ टक्के कर
- ७ ते १० लाख उत्पन्न – १० टक्के कर
- १० ते १२ लाख उत्पन्न – १५ टक्के कर
- १२ ते १५ लाख उत्पन्न – २० टक्के कर
- १५ लाखांवर उत्पन्न – ३० टक्के कर
या नव्या कररचनेचा फायदा ४ कोटी पगारदार आणि पेन्शनधारक यांना होईल.
“विकसित भारतासाठी रोडमॅप तयार करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे. आमचा भर रोजगार आणि कौशल्यावर आहे. सुधारणावादी धोरणांवर भर आहे”, असे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community