- ऋजुता लुकतुके
नवी दिल्लीत रायसिना मार्गावरील नॉर्थ ब्लॉकी ही इमारत म्हणजे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं कार्यालय आहे. तिथेच बुधवारी उशिरा अर्थसंकल्पापूर्वीचा हलवा समारंभ साजरा झाला. याचाच अर्थ अर्थसंकल्पाला मूर्त रुप आलं असून आता मूळ अर्थसंकल्प आणि संबंधित विविध कागदपत्रांची छपाई सुरू झाली आहे. (Union Budget 2024)
हलवा समारंभासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री भगवान कराड उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता १ फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. (Union Budget 2024)
हलवा समारंभाला पारंपरिक महत्त्व आहे. दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्री नॉर्थ ब्लॉकमध्ये एका मोठ्या कढईत स्वत: हलवा ढवळतात. आणि त्यांच्या मदतीने तयार झालेला हा हलवा अर्थमंत्री आपल्या सहकाऱ्यांना खिलवतात. अर्थ मंत्रालयातील विविध सचिव आणि तज्ज, जे अर्थसंकल्प तयार करण्यात गुंतलेले असतात, अशा हजारो लोकांना हा हलवा दिला जातो. अर्थसंकल्प तयार झाला आहे, याचीच ही ग्वाही असते. (Union Budget 2024)
#WATCH | Delhi | The Halwa ceremony, marking the final stage of the Budget preparation process for Interim Union Budget 2024, was held in North Block, today, in the presence of Union Finance & Corporate Affairs Minister Nirmala Sitharaman and Union Minister of State for Finance… pic.twitter.com/wjoyI5QqQ3
— ANI (@ANI) January 24, 2024
(हेही वाचा – Vasant Panchami : वसंत पंचमीचा ‘हा’ इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?)
हलवा समारंभानंतर अर्थसंकल्प बनवणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी नॉर्थ ब्लॉकमधील सुरक्षित इमारतीत आपला मुक्काम हलवतात. आणि अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करेपर्यंत ते कुटुंबीयांनाही भेटत नाहीत. अर्थसंकल्पाची गुप्तता पाळण्यासाठी हे पाऊल उचललं जातं. (Union Budget 2024)
या कालावधीला लॉक-इन कालावधी म्हटलं जातं. यंदाचा अर्थसंकल्प हा लेखानुदान स्वरुपाचा असणार आहे. कारण, २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे सरकार यंदा कुठलीही नवीन घोषणा करू शकत नाही. पुढील चार महिन्यांसाठीच्या खर्चाची तरतूद या लेखानुदानात करण्यात येईल. आणि नवीन सरकारचे नवे अर्थमंत्री जुलै महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर करतील. (Union Budget 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community