-
प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ हा सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे, असे मत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक मोठे पाऊल असल्याचे नमूद केले.
(हेही वाचा – Maharashtra Weather Update: राज्याचा पारा आणखी चढणार; अवकाळी पावसाची शक्यता)
विकसित भारताच्या दिशेने भक्कम पाऊल
प्रविण दरेकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. सर्व घटकांचा विचार करून अर्थसंकल्प सादर केला असून, यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल.”
(हेही वाचा – Union Budget 2025 : अर्थमंत्र्यांचा पगारदार मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १२.७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त)
महत्त्वपूर्ण तरतुदी :
- शेतकरी आणि ग्रामीण भाग : “शेतकऱ्यांसाठी ‘धनधान्य योजना’, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवणे यांसारखी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.”
- मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्ग : “आयकर मर्यादेत वाढ करून कर सवलत दिली आहे. यामुळे नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.”
- महिला आणि उद्योजकता : “महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात आहेत.”
- राज्यांना विकासासाठी भरीव मदत : “पायाभूत सुविधा विकासासाठी राज्यांना मोठा निधी देण्यात आला आहे.”
- परदेशी गुंतवणूक आणि व्यापार : “विमा क्षेत्रात १००% परदेशी गुंतवणुकीला मान्यता आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यात आली आहे.”
- आर्थिक स्थैर्य : “राजकोषीय तूट नियंत्रित ठेवण्यात आली असून कर उत्पन्नात वाढ झाली आहे.”
(हेही वाचा – )
सर्वसमावेशक अर्थसंकल्प
दरेकर पुढे म्हणाले, “महिला, शेतकरी, श्रमजीवी, गरीब, नोकरदार वर्ग, युवक आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांसाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतुदी आहेत. सर्वांना सामावून घेत अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसतो.”
“हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देणारा असून, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा हा एक मजबूत पाया असेल,” असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community