-
प्रतिनिधी
शनिवारी जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताचे मिशन पूर्णत्वास नेणारा अर्थसंकल्प आहे, अशी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितली. देशातील मध्यमवर्गीयांच्या हिताला महत्त्व देत तयार केलेली नवी कर रचना देशाच्या नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करणारी आहे. शेलार यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पामुळे ग्रामिण व्यवस्थेमध्ये नवी क्रांती होईल आणि नागरिकांना आरोग्य सुविधा प्राप्त करण्यास महत्त्वपूर्ण मदत मिळेल. तसेच, मोदी सरकारचा महिलांना सक्षम करणारा आणि शेतकऱ्यांना भरघोस निधी उपलब्ध करणारा हा अर्थसंकल्प आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देणारा हा अर्थसंकल्प राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा आहे. (Union Budget 2025)
(हेही वाचा – Union Budget 2025 : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीला गतीमान करणारा अर्थसंकल्प – अशोक चव्हाण)
समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – प्रविण दरेकर
भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, नोकरदार, मध्यमवर्गीय आणि उद्योग क्षेत्र या सर्व घटकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न हे देशाला विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सामील करणे हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट २०४७ पर्यंत साध्य करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढे एक दमदार पाऊल टाकले आहे. दरेकर यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प सर्व घटकांच्या अपेक्षांना पूर्ण करणारा आहे. (Union Budget 2025)
(हेही वाचा – Maharashtra Weather Update: राज्याचा पारा आणखी चढणार; अवकाळी पावसाची शक्यता)
महत्त्वपूर्ण घोषणा :
- धनधान्य योजना : शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध.
- किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविणे : शेतकऱ्यांसाठी अधिक आर्थिक मदत.
- एमएसएमईसाठी उपाययोजना : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना.
- महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजकतेसाठी तरतुदी : महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून अधिक ताकद मिळेल.
- मध्यमवर्गीयांसाठी आयकर सवलती : विशेषत: चाकरमान्यांना व ज्येष्ठ नागरिकांना आयकरात दिला गेलेला दिलासा.
- श्रमजीवींच्या हितासाठी उपाययोजना : श्रमिक वर्गाला अनुकूल पावले उचलली गेली आहेत.
- राज्यांना पायाभूत सुविधांसाठी मदत : राज्यांना विविध पायाभूत क्षेत्रांसाठी आवश्यक मदत.
- कर उत्पन्नात वाढ : कर व्यवस्थेतील सुधारणा आणि राज्य हिश्श्यात भरघोस वाढ.
दरेकर यांनी हेही सांगितले की, या अर्थसंकल्पामुळे देशातील सर्व घटकांना प्रोत्साहन मिळेल आणि भारताच्या सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जाईल. (Union Budget 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community