- ऋजुता लुकतुके
केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वेच्या विविध योजनाही मांडल्या जाणार आहेत. यात हाय-स्पीड रेल्वे मार्ग, रेल्वेत एआयचा वापर तसंच वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती या क्षेत्रात काय तरतूद होते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. नवीन रेल्वे मार्गांची घोषणाही होऊ शकते. (Union Budget 2025)
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात रेल्वेला काय मिळणार याकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत. २०२५ मध्ये भारतीय रेल्वेचे नेटवर्कला अधिक आधुनिक बनवणे, प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करणे, देशभरात रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवणे, अशा गोष्टींवर भर दिला जाऊ शकतो. सुरक्षा, स्थिरता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर देखील भर दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार प्रवाशांना चांगली सुविधा देणे आणि मालवाहतुकीची सेवा विस्तारित करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. याशिवाय बजेटमध्ये नव्या हायस्पीड ट्रेन सुरु करणे, नवी स्टेशन उभारणे, रेल्वे स्टेशनचा विकास करताना पर्यावरणपूरक पद्धतीने करणे यासाठी निर्णय घेतले जाऊ शकतात. (Union Budget 2025)
भारतीय रेल्वे कडून तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढवली जाऊ शकते. रेल्वे त्यांच्या विविध यंत्रणांच्या चांगल्या कामगिरीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर भर देण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय रेल्वे कडून मर्यादित प्रमाणात यायचा वापर केला जातो. भारतीय प्रवाशांना सुरक्षित विश्वासार्ह सेवा पुरवण्यासाठी रेल्वेकडून रेल्वेचे रूळ आणि रेल्वे गाड्यांची स्थिती याचं निरीक्षण करण्यासाठी या संचलित यंत्रणेचा वापर केला जाऊ शकतो. (Union Budget 2025)
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वी लिनेन इन्स्पेक्शन अँड सॉर्टिंग प्रणाली अर्थात लिसा लाँच केली आहे. याचा वापर करून रेल्वेच्या डब्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चादरींचा दर्जा, त्याच्यावरील डाग ऑटोमॅटिक तपासण्यासाठी आणि खराब चादरी वेगळ्या काढण्यासाठी या तंत्रज्जानाचा वापर करण्यात आला आहे. (Union Budget 2025)
(हेही वाचा – आसिफच्या वासनेची शिकार ठरली अल्पवयीन Hindu मुलगी; धर्मांतराला नकार दिल्याने साथीदारांसह मिळून केली हत्या)
भारतीय रेल्वेने आथिर्क वर्ष २०२४-२५ मध्ये रेल्वे बजेट मध्ये ५४,११३ कोटी रुपये रोलिंग स्टॉक साठी दिले होते. २०२३-२४ च्या तुलनेत अतिरिक्त १५६ कोटी रुपयांची तरतूद गेल्यावेळी करण्यात आली होती. रोलिंग स्टॉक मध्ये रेल्वेचे डबे, लोकोमोटिव, फ्रेट वॅगन आणि दुसऱ्या विशेष वाहनांचा समावेश असतो. या निधीचा वापर रेल्वेच्या देखभालीसाठी खासकरून होते. त्यामुळे यंदाही रोलिंग स्टॉकमध्ये वाढ होते का हे पाहावं लागेल. (Union Budget 2025)
त्याचबरोबर भारतीय रेल्वेनं वंदे भारत रेल्वे गाड्यांबरोबरच रेल्वे भारत स्लिपर कोचच्या बांधणीची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर अमृत भारत रेल्वे गाड्यांचाही प्रस्ताव आहे. त्यांच्या उभारणीसाठी किती निधी दिला जातो हे पाहावं लागेल. एका अहवालानुसार, रेल्वेने गेल्या वीस वर्षात १ लाख किलोमीटर अंतराचे रेल्वे रुळ बनवले आहेत. ४४,००० किलोमीटर च्या अंतरात कवच यंत्रणा लागू केली आहे. या तंत्रज्ञानासह ५०,००० लोकोमोटिव बसवण्यासह ३ वर्षांत ४०० नव्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीचे लक्ष्य रेल्वेनं ठेवलं आहे. (Union Budget 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community