Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?

40
Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?
Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय कोणते ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचे बजेट (Union Budget 2025) सादर केले. कॅबिनेट बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली. निर्मला सीतारमण यांनी (Nirmala Sitharaman) सलग आठव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी आरोग्य अर्थसंकल्पाबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. यात रुग्णांना, विशेषतः कर्करोग आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्यांना मदत करण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना मूलभूत सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात येणार आहे. (health sector )

कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर सुरू करणार
या सोबतच कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर (Daycare) सुरू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. जेणेकरून कर्करोगाच्या रुग्णांना विशेष काळजी घेता येईल. कॅन्सर (Cancer) हा इतका घातक आणि प्राणघातक आजार आहे. परिणामी हा रोग रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अशा सर्वच बाजूंनी हानी पोहोचवतो. मात्र आता सरकारतर्फे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डे-केअर सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ज्याद्वारे रुग्णाला आणि त्याच्या कुटुंबीयांना उपचारासोबतच मानसिक आधार आणि व्यावहारिक मदतही दिली जाईल. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना जलद पुनर्प्राप्त करण्यात मदत करू शकते आणि वेळ आणि पैसा वाचवू शकते. (Union Budget 2025)

आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय (Union Budget 2025)
• गंभीर आजारांवरील 36 जीवनरक्षक औषधांवर पूर्णतः शुल्क माफी
• सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये कॅन्सर डे-केअर केंद्रे स्थापन केली जाणार
• कॅन्सर उपचारासाठी आवश्यक औषधे स्वस्त होतील
• 6 जीवनरक्षक औषधांवर कस्टम ड्युटी 5% करण्यात येणार

डे-केअर म्हणजे ? (Union Budget 2025)
डे केअर सेंटर्स केमोथेरपी इन्फ्युजन सुविधा देतात. जे प्रायव्हेट लाउंज किंवा कॉमन एरियामध्ये दिले जाऊ शकते. डे केअर सेंटर्स रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कर्करोगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समुपदेशन आणि इतर सहाय्य प्रदान करतात. डे केअर सेंटर्स रुग्णांना साइड इफेक्ट्स व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात आणि मसाज किंवा एक्यूपंक्चर सारखे वैद्यकीय सहाय्य प्रदान करू शकतात. (Union Budget 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.