मुंबई क्षयरोग जिल्हयांना केंद्राचे चार पुरस्कार!

मुंबईतील क्षयरोग मुक्तीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

113

भारत सरकारद्वारे क्षयरोग नियंत्रण विषयक कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन, दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतात. याबाबतच्या चार पुरस्कारांची मुंबई महापालिका मानकरी ठरली आह. नवी दिल्लीत बुधवारी झालेल्या एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आणि देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत चार पुरस्कारांनी मुंबई महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. यामध्ये एक रजत व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. मुंबईतील क्षयरोग मुक्तीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

IMG 20210324 WA0014

या चार जिल्ह्यांचा सन्मान

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशासकीय दृष्ट्या मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा असे दोन जिल्हे असले, तरी क्षयरोग नियंत्रणासाठी मुंबईत २४ क्षयरोग जिल्ह्यांची(टी.बी) रचना आहे. मुंबईतील परळ क्षयरोग जिल्ह्यास रजत पदकाने गौरविण्यात आले आहे. तर घाटकोपर, ग्रँट रोड व प्रभादेवी या तीन जिल्ह्यांना कांस्य पदकाने गौरविण्यात आले आहे.

IMG 20210324 WA0017

महानगरपालिकेच्या वतीने शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर प्रणिता टिपरे आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या ४ क्षयरोग जिल्ह्यांचे ‘जिल्हा क्षयरोग अधिकारी’ डॉक्टर नरेंद्र सुतार, डॉक्टर मेघा बासेकर, डॉक्टर रूपाली हिरे आणि डॉक्टर रचना विश्वजीत यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे क्षयरोग अधिकारी डॉक्टर रामजी अडकीकर हे उपस्थित होते.

IMG 20210324 WA0015

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.