पुणे आणि मंबई मॉडेल्सचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कौतुक! देश पातळीवर निर्माण केला आदर्श

मुंबई व पुण्याचे अंमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

84

कोविडच्या दुस-या लाटेतही मुंबई आणि पुण्यात अंमलात आणलेल्या विकेंद्रीकरण मॉडेलचे देशभरात कौतुक होत आहे. केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव अग्रवाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना, कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबई व पुण्याचे अंमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

असे आहे मुंबई मॉडेल

नागरिकांना संपर्क साधता यावा, त्यांच्या अडचणी सांगता याव्यात, यासाठी मुंबई महापालिकेकडून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते, मात्र ते महापालिका पातळीवर नाही, तर वॉर्ड पातळीवर तयार करण्यात आले होते. 24 वॉर्डांसाठी प्रत्येकी एक, असे 24 नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडे जे रुग्ण चाचणीचे रिझल्ट येत, ते संबंधित वॉर्डातल्या नियंत्रण कक्षात पाठवले जात. हे कक्ष केंद्र म्हणून काम करत आणि त्यानुसार प्रत्येक वॉर्डात रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देण्यात आला.

(हेही वाचाः म्युकरमायकोसीस म्हणजे काय? काय आहेत लक्षणे? कसे दूर ठेवाल? वाचा उत्तरे…)

प्रत्येक वॉर्डरुम मध्ये 30 दूरध्वनी लाईन्स होत्या, त्या सांभाळण्यासाठी 10 फोन ऑपरेटर्स, 10 डॉक्टर्स आणि 10 रुग्णवाहिका होत्या. तसेच, खाटांची उपलब्धता सांगणारे 10 डॅशबोर्ड देखील या कक्षांमध्ये लावण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना त्यांच्या नातेवाईकांना काहीही त्रास झाला नाही, अशी महिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

WhatsAppImage2021 05 11at6.08.07PMOLOR

(हेही वाचाः १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेला लागणार ब्रेक?)

महापालिकेच्या योजनाबद्ध प्रयत्नांचे कौतुक

मुंबईत 800 SUV गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिका म्हणून रुपांतरित करण्यात आल्या होत्या. या सर्व रुग्णवाहिकांचा माग काढत त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आला. या सर्व व्यवस्था समन्वय राखून योग्यप्रकारे काम करत होत्या, जेणेकरुन रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये. असे सांगत, अग्रवाल यांनी मुंबई महापालिकेच्या या योजनाबद्ध प्रयत्नांचे कौतुक केले.

पुण्यातील यंत्रणांचेही कौतुक

पुण्यातही कोविड-19च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळालेल्या यशाबद्दल, आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील यंत्रणांचेही कौतुक केले. संसर्गाचे प्रमाण कसे नियंत्रणात आणता येईल, यासाठी या उपाययोजना आदर्श उदाहरण ठरल्या आहेत.

(हेही वाचाः राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटते, तरी नवीन जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा! )

जेव्हा पुण्यात, रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण 69.7% होते, त्यावेळी पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत कठोर संचारबंदी सारख्या उपाययोजना करण्यात आल्या, याचे दोन परिणाम दिसले:

  1. कोविड रुग्णांच्या वाढीचे प्रमाण कमी झाले.
  2. कोविड रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर कमी झाला. आधी 41.8% असलेला हा दर 23.4 % पर्यंत कमी झाला.

WhatsAppImage2021 05 11at6.07.47PMWKXC

मोठे समारंभ, लोकांची गर्दी यावर निर्बंध, अत्यावश्यक नसलेल्या कामांवर प्रतिबंध घालण्यासारखे कठोर उपाय साधारण 15 दिवसांसाठी केल्यावर, रुग्णवाढीचा दर कमी होतो आणि रुग्णवाढीचा चढता आलेख सपाट व्हायला सुरुवात होते, असे आमचे निरीक्षण आहे. असे आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

(हेही वाचाः राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.