करोनाप्रमाणे चीन मध्ये H9N2 चा प्रादुर्भाव वाढला आहे. हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्यामुळे भारतीय नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H9N2) चा भारताला कमी धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. (H9H2 Update )
उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचा आजार वाढला आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने एक निवेदन देखील जारी केले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये श्वसनाच्या आजारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
H9N2 व्हायरसची प्रकरणे आणि श्वसनाच्या आजारासंबंधी झालेल्या उद्रेकावर भारत सरकार लक्ष ठेवून आहे. आरोग्य मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटलंय की, चीनमधून नोंदवलेले एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणे आणि श्वासोच्छवासाच्या आजारांचा भारतात कमी धोका आहे, असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलेय. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनाही या आजाराकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा : Chitra wagh vs Sanjay Raut : स्वत:ची केवढी अवनती करून घेतलीत हो तुम्ही…, चित्रा वाघ यांची पोस्ट चर्चेत)
केंद्रीय मंत्रालयाचे काय आहे म्हणणे
“भारत कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आरोग्य परिस्थितीसाठी तयार आहे. अशा सार्वजनिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्याच्या दिशेने एक समग्र आणि एकात्मिक रोडमॅपचा अवलंब करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलं आहे.कोविड महामारीनंतर आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्येही वाढ झाली आहे. पीएम-आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन हे पंतप्रधानांनी सुरू केले होते. यामुळे आरोग्य प्रणाली तयार करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय श्रेणीतील सर्व स्तरांवर आरोग्य यंत्रणा आणि संस्थांची क्षमता विकसित करता येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community