omicron व्हेरियंट : केंद्र सरकार इन एक्शन!

117

कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ने थैमान घातले आहे. त्यामुळे भारताचीही चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना चाचण्या वाढविण्याचे आणि हॉटस्पॉट भागात कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे धोका वाढत आहे. हे लक्षात घेत राज्यांनी स्थितीवर कडक नियंत्रण ठेवायला हवे, असे केंद्राने म्हटले आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आहे, त्यांना भारताने ‘जोखीम’ असलेल्या देशांच्या श्रेणीत टाकले आहे. आता विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त उपायांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा धक्कादायक! वृद्धाश्रमातील 69 वृद्धांना कोरोना)

कोविड नियमावलीची अंमलबजावणी आवश्यक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी एक निवेदन जारी केले आहे. ‘संसर्ग प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी सखोल नियंत्रण, सक्रिय पाळत ठेवणे, लसीकरणाला गती देणे आणि कोविड नियमावलीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे’, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

राज्यांना दुसऱ्यांदा इशारा

‘विदेशातून येणारे सर्व प्रवासी आणि ‘जोखीम’ श्रेणीतील इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांची योग्य प्रकारे चाचणी करण्यात यावी. पॉझिटिव्ह आढळल्यास, नमुना प्रयोगशाळेत पाठवा. ज्या राज्यांमध्ये चाचणी कमी केली जात आहे, तिथे चाचण्यांची संख्या वाढवावी, असे केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दुसऱ्यांदा हा इशारा दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.