केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील लालबागच्या राजाचे सपत्नीक दर्शन घेतले आहे. (Amit Shah) या वेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्यही मंत्रीगण उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. ते प्रतिवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
गेल्यावर्षीही अमित शहा सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक झाले होते. (Amit Shah) आज दुपारी अमित शहा यांचे मुंबई विमानतळावर आमगन झाले. यानंतर ते कुटुंबासह लालबाग राजाच्या मंडपात पोहोचले. लालबाग राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन तेथील गणपतीचे दर्शन घेतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाऊनही अमित शहा गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर त्यांचे मुंबई विद्यापीठात व्याख्यान होणार आहे.
पूरा देश हर्षोल्लास से गणेशोत्सव मना रहा है। आज मुंबई के विश्वप्रसिद्ध लाल बाग के राजा के दर्शन करने के लिए उत्सुक हूँ। साथ ही, बांद्रा पश्चिम के प्रसिद्ध गणपति पंडाल में भी पूजन करूँगा।
शाम को सहकारिता आंदोलन के प्रमुख स्तंभ श्री लक्ष्मणराव इनामदार जी की स्मृति में आयोजित एक…
— Amit Shah (@AmitShah) September 23, 2023
अमित शाह दर्शनाला येतील म्हणून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी काही काळासाठी दर्शन बंद ठेवण्यात आलं. सर्व मंडप रिकामा करण्यात आला. लालबागच्या राजाच्या मंडळातील कार्यकर्त्यांना बाजूला करण्यात आलं. फक्त काही महिला स्वयंसेवक आणि मंडळाचे मोजके स्वयंसेवक आणि पोलीस मंडपात होते. (Amit Shah)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community