- प्रतिनिधी
जुन्या मोडकळीस आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (एनसीडीसी) मुंबई बँकेने केलेल्या मागणीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत दिल्लीत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती भाजपा नेते व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली.
(हेही वाचा – Gukesh India No One : गुकेश अर्जुन एरिगसीला मागे टाकून बनला भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू)
मुंबईत आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित शाह यांची भेट घेत दरेकर यांनी या संदर्भातील निवेदन सादर केले. माध्यमांशी बोलताना दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती मोडकळीस आल्या असून त्यांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. मात्र, खाजगी विकासकांच्या गैरप्रकारांमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेने स्वयंपुनर्विकासासाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे.
(हेही वाचा – मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील Carnac Bridge चा दुसरा गर्डर शनिवारी रात्री बसवणार)
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले की, विकासकांपेक्षा अधिक फायदेशीर ठरलेल्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मुंबई बँकेच्या आर्थिक मर्यादेमुळे ही योजना संपूर्ण क्षमतेने राबविण्यात अडथळे येत आहेत. एनसीडीसीकडून निधी उपलब्ध झाल्यास अनेक रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल. योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी एनसीडीसीच्या कर्ज मंजुरी पत्रातील अटी रद्द करण्याची विनंतीही अमित शाह यांना करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष देत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच या संदर्भात दिल्लीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अनेक जुन्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community