मायक्रोसॉफ्टच्या मदतीने केंद्र सरकार तरुणांना करणार ‘डिजीसक्षम’! इतक्या नोक-या मिळणार

या उपक्रमांतर्गत देशभरात 10 दशलक्ष लोकांना नोकरी दिली जाणार आहे.

कोविडमुळे लाखो लोकांच्या नोक-या गेल्या, बरेच तरुण बेरोजगार झाले, तसेच देशाची अर्थव्यवस्थाही कोलमडली. त्यामुळे आता तरुणांसाठी रोजगार निर्मिती करणे आणि अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याकडे भर दिला जात आहे. याचाच परिणाम म्हणून मायक्रोसॉफ्ट आणि भारताच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय यांच्या सहयोगाने (MoLE) नोकरी शोधणाऱ्यांना विनामूल्य डिजीटल कौशल्य प्रशिक्षण उपक्रम ‘डिजीसक्षम’ सुरू करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या उपक्रमांतर्गत देशभरात 10 दशलक्ष लोकांना नोकरी दिली जाणार आहे.

काय म्हणाले केंद्रीय रोजगार मंत्री?

या योजनेंतर्गत, राष्ट्रीय करिअर सेवा(NCS) प्लॅटफॉर्मवर 10 दशलक्ष लोकांना अधिकृत नोंदणी करुन नोकरी शोधणाऱ्यांना काही वर्षांमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात प्रगत संगणकांसह डिजीटल आणि तांत्रिक कौशल्यांचाही समावेश करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पहिल्या वर्षी 3 लाखांहून अधिक नोकरी शोधणाऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. त्यांना प्रोग्रामिंग भाषा, डेटा अॅनालिटिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट तसेच मूलभूत आणि प्रगत डिजीटल उत्पादकता यासारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

(हेही वाचाः अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहोचवले, तर केंद्र सरकार देणार पैसे! अशी आहे योजना)

कौशल्य विकासाला मिळणार चालना

या उपक्रमांतर्गत कोविड -19 मुळे नोकरी गमावलेल्या वंचित समाजातील आणि विकासाच्या मार्गावर असणा-या भागातील लोकांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, या उपक्रमाद्वारे नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, नवे कौशल्य आत्मसात करणे, अंगी असलेल्या कौशल्यांना विकसित करणे यांचा समावेश आहे.

(हेही वाचाः फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टा बंद पडणारा सापडला! कोण आहे ‘तो’?)

जागतिक बांधिलकीचा एक भाग

“श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी सहकार्याच्या माध्यमातून डिजीटल इक्विटी अंतर कमी करण्यासाठी आणि भारतातील तरुणांना डिजीटल अर्थव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी सक्षम बनवणे हा हेतू आहे. या उपक्रमातून आपली एक ओळख बनण्याची तरुणांनी ही अनोखी संधी आहे. सर्वांना समान संधी आणि डिजीटल कौशल्यांमध्ये प्रवेश देणे हे भारतासाठी दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक मूल्य तयार करण्याची गुरुकिल्ली म्हणून काम करेल. असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी म्हणाले.

(हेही वाचाः ऊर्जा विभागाच्या भरती प्रक्रियेत विद्यार्थी का आहेत नाराज?)

25 कोटी लोकांना कोविड -19 अर्थव्यवस्थेत डिजीटल कौशल्य आत्मसात करण्यास मदत करण्यासाठी ‘डिजीसक्षम’ हे मायक्रोसॉफ्टच्या जागतिक बांधिलकीचा एक भाग आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here