केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांच्यावर हल्ला, आपचा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात

103
केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांच्यावर हल्ला, आपचा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात
केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांच्यावर हल्ला, आपचा माजी जिल्हाध्यक्ष ताब्यात

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) यांच्यावर बिहारमध्ये जनता दरबार सुरू असताना एक तरुणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी घडलेल्या या घटनेत सिंह यांना मारहाणीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. आम आदमी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष मोहम्मद सैफी यांच्यावर गोंधळ घालण्याचा आणि हल्ला केल्याचा गिरिराज सिंह यांनी आरोप केला आहे. सैफी यांनी मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्याचे गिरिराज यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; नवे दर जाहीर)

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून गिरीराज सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी गिरीराज आहे आणि समाजाच्या हितासाठी मी नेहमीच बोलत राहीन आणि संघर्ष करत राहीन. मी या हल्ल्यांना घाबरत नाही.

गिरीराज सिंह यांनी वक्फ बोर्डावर प्रश्न उपस्थित केले असून वक्फ बोर्ड बेगुसराय येथील हिंदूंच्या जमिनीवरही नोटीस पाठवत आहे आणि त्यावर आपला दावा करत आहे, असा आरोप सिंह यांनी केला आहे.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह (Giriraj Singh) बलिया उपविभागीय कार्यालयात आयोजित जनता दरबारात लोकांना भेटत होते आणि लोकांच्या समस्या ऐकत होते. त्याचवेळी मोहम्मद सैफी तेथे आले आणि त्यांनी माईक हातात घेत काही वक्तव्य केले. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध करत सैफी यांच्या हातातील माईक घेण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी सैफी यांनी गिरिराज सिंह यांच्या दिशेने धावत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी सैफी यांना पकडले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.