पुणे जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनला अडकले आहेत, त्यांच्या पालकांची आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरण यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद उपस्थित होते. आपल्या मुलांना लवकरात लवकर भारतात सुखरुप परत आणू, असे आश्वासन यावेळी व्ही. मुरलीधरण यांनी पालकांना दिले.
सरकारचं आश्वासन
आम्ही आमच्या मुलांच्या सातत्याने संपर्कात आहोत. बॉर्डर क्रॉस करताना मुलांना काहीही अडचण येऊ नये, असं देखील आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना युक्रेनियन सैनिकांकडून मारहाण होत असल्याचं सांगितलं जातं आहे, ते सत्य असल्याचं देखील यावेळी पालकांनी सांगितले. मुलांशी झालेल्या संपर्कात ज्या गोष्टी कळल्या त्याची माहिती देखील आम्ही मंत्र्यांना दिली असल्याचे पालकांनी यावेळी सांगितले.
( हेही वाचा: ईडी हाताळत असलेली हाय प्रोफाईल प्रकरणे! ‘हे’ आहेत घोटाळ्यांचे ‘नवाब’? )
आमच्या मुलांचे हाल थांबवा
युक्रेनमध्ये आमच्या मुलांचे खाण्याचे व राहण्याचे खूप हाल होत आहेत. हे हाल थांबवून आमच्या मुलांना शक्य तितक्या लवकर भारतात सुखरूप परत आणावे, अशी मागणी आम्ही मंत्र्यांकडे केली असल्याचे, युक्रेनमधल्या मुलांच्या पालकांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community