“संविधान बदलण्याचे नरेटिव्ह पसरवणारे संविधान विरोधी” केंद्रीय राज्यमंत्री Ramdas Athawale यांचा आरोप

42
मुंबई प्रतिनिधी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुंब्र्यात आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या बदलावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान (Constitution of India) हे सर्व जाती आणि धर्मांतील लोकांना समान न्याय देणारे आहे. संविधान कधीही बदलले जाणार नाही.” ते पुढे म्हणाले की, काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि इतर विरोधक संविधान बदलले जाईल अशा खोट्या अफवा पसरवत आहेत. अशा खोट्या नरेटिव्ह (Fake narrative) पसरवणारे लोकच संविधान विरोधी असून, ते समाजात फूट पाडत आहेत.

मुंब्र्यातील धम्म चक्र प्रवर्तन केंद्राचे (Dhamma Chakra Pravantha Kendra) उद्घाटन रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या हस्ते झाले. या कट्टात ग्रंथालय, वाचनालय आणि बैठकीसाठी सुविधांचा समावेश आहे, जो समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.

(हेही वाचा – Best Bus Accident : पाच वर्षांत 834 अपघात, 88 नागरिकांचा मृत्यू; 42.40 कोटींची नुकसान भरपाई)

यावेळी, आठवले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली संविधान मजबूत होईल, असे सांगितले. “मोदी सरकारचे मंत्री मंडळ संविधानाच्या सशक्तीकरणासाठी काम करत आहे,” असे ते म्हणाले. तसेच, महिला अत्याचार रोखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – Swami Vivekanand यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा)

कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी ना. रामदास आठवले यांनी सादर केलेली शीघ्रकवितेला सर्व उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद दिला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.