व्हाॅट्सअॅपने भारताचा नकाशा दाखवला चुकीचा; केंद्राने खडसावले 

भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याबद्दल सरकार व्हॉट्सअॅपवर तीव्र नाराज आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विटरला देशाचा चुकीचा नकाशा दुरुस्त करण्यास सांगितले. भारतात व्यवसाय करणाऱ्या सोशल प्लॅटफॉर्मने देशाचा अचूक नकाशा वापरला पाहिजे.

काय आहे प्रकरण?

राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले, “प्रिय व्हॉट्सअॅप, भारताच्या नकाशातील त्रुटी लवकरात लवकर दुरुस्त करण्याची तुम्हाला विनंती आहे. भारतात व्यवसाय करणार्‍या आणि/किंवा भारतात व्यवसाय सुरू ठेवू इच्छिणार्‍या सर्व प्लॅटफॉर्मने योग्य नकाशे वापरावेत. राजीव चंद्रशेखर यांच्या ट्विटला उत्तर देताना व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, “अनपेक्षित त्रुटी निदर्शनास आणल्याबद्दल मंत्री महोदयांचे आभार. क्षमस्व, आम्ही त्वरीत नकाशा काढला आहे. भविष्यात आम्ही त्याची काळजी घेऊ.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅपने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लाईव्हस्ट्रीमबद्दल पोस्ट केले. पोस्टमध्ये एक ग्लोब दर्शविला होता, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरशी संबंधित भारताचा चुकीचा नकाशा दर्शविला होता.

(हेही वाचा वर्ष 2022 : राजकारणात उलथापालथ घडवून आणणाऱ्या 5 घटना)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here