भारत खरंच ‘अंधाराच्या’ दिशेने? केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

भारत हा चीननंतर जगातील सर्वात मोठा कोळसा ग्राहक देश आहे. सध्या कोळशाच्या पुरवठ्याची तीव्र कमतरता देशाला जाणवत आहे. त्याचा परिणाम पंजाब, राजस्थान, तामिळनाडू आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये वीज निर्मितीवर होऊ लागला आहे.

त्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वीजसंकटाबाबत पत्र लिहिले आहे, तर तेलंगणा वीजनिर्मिती केंद्र जेन्कोच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे, की त्यांच्याकडे पुढील एक आठवडा ते 10 दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे मोठे वीजसंकट निर्माण झाले असून, देशात अंधार पसरण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. पण याबाबत आता केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आरके सिंह यांचे स्पष्टीकरण

देशात कोळशाची कुठलीही कमतरता नाही, या चर्चांना विनाकारण वाढवण्यात येत आहे. GAIL(नॅचरल गॅस ट्रान्समिशन कंपनी) कडून बवाना गॅस स्टेशनला गॅस पुरवठा बंद करतील, असा संदेश पाठवण्यात आला होता. त्यांचा करार संपत असल्याने हा संदेश पाठवला होता पण त्याचा विपर्यास करण्यात आला. गरज पडली तर इंपोर्टेड गॅससुद्धा देशभरात उपलब्ध करण्यात येईल, वीज निमिर्तीसाठी स्टॉक सप्लाय सुरू राहिल, असे केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी स्पष्ट केले.

तसेच TATA च्या सीईओंना सुद्धा इशारा देण्यात आला की यापुढे अशा निराधार गोष्टींना थारा देऊ नये. कोळशाची मागणी निश्चितच वाढली आहे. कारण आपली अर्थव्यवस्था वाढतेय, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. असेही ऊर्जा मंत्र्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here