- ऋजुता लुकतुके
तेल इंधनाचा वापर आणि आयात कमी करणं हे केंद्र सरकारचं महत्त्वाचं उद्दिष्टं आहे. त्यादृष्टीने महत्त्वाचं पाऊल सरकारने टाकलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि हायवेज् मंत्री नितीन गडकरी यांनी २९ ऑगस्ट ला जगातील पहिल्या इथेनॉलवर चालणाऱ्या टोयोटा इनोव्हा गाडीचं अनावरण केलं. या गाडीमुळे स्वच्छ इंधनाचा प्रसार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट सफल होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरीही उपस्थित होते. ही गाडी किर्लोस्कर टोयोटा कंपनीने विकसित केली आहे. देशाची इंधन आयात कमी व्हावी आणि जीवाश्म इंधनाचा वापर कमी व्हावा हे देशाचं उद्दिष्ट त्यामुळे साध्य होणार आहे.
‘भारत लवकरच इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायो-डिझेल, बायो-एलएनजी, बायो-सीएनजी अशा पर्यायी इंधनांच्या क्षेत्रात एक मोठी बाजारपेठ होईल, असा मला विश्वास आहे. आणि यातून भारतीय अर्थव्यवस्थेतही भर पडेल. भारतीय शेतकरी, जो देशाचा अन्नदाता आहे, तो आता ऊर्जादाताही होईल,’ असा विश्वास नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात मांडला.
𝐘𝐞𝐭 𝐚𝐧𝐨𝐭𝐡𝐞𝐫 𝐫𝐞𝐦𝐚𝐫𝐤𝐚𝐛𝐥𝐞 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐢𝐧 𝐈𝐧𝐝𝐢𝐚’𝐬 𝐚𝐮𝐭𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐯𝐞 𝐢𝐧𝐝𝐮𝐬𝐭𝐫𝐲!
Launched the 𝐰𝐨𝐫𝐥𝐝’𝐬 𝐟𝐢𝐫𝐬𝐭 𝐩𝐫𝐨𝐭𝐨𝐭𝐲𝐩𝐞 𝐨𝐟 𝐭𝐡𝐞 𝐁𝐒 𝟔 𝐒𝐭𝐚𝐠𝐞 𝐈𝐈 ‘𝐄𝐥𝐞𝐜𝐭𝐫𝐢𝐟𝐢𝐞𝐝 𝐅𝐥𝐞𝐱 𝐅𝐮𝐞𝐥 𝐕𝐞𝐡𝐢𝐜𝐥𝐞’,… pic.twitter.com/eRR1kM03Pb
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 29, 2023
(हेही वाचा – कलम ३७० हटवल्याचे यश; काश्मीर खोऱ्यात हॊणार Miss World 2023 स्पर्धा)
टोयोटा कंपनीनेही एक प्रसिद्धीपत्रक जारी करत जैव-इंधनाच्या वापराप्रती आपली निष्ठा व्यक्त केली आहे. ही टोयोटा इनोव्हा BS-VI इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स इंधन प्रकारातील पहिली प्रवासी गाडी असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तसंच या प्रकारची बाजारपेठ विस्तारत असल्याचा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोयोटा मिराई कंपनीच्या भागिदारीतून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या इलेक्ट्रिकल गाडीची घोषणाही केली होती. या महिन्याच्या सुरुवातीलाच नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या टोयोटा-इनोव्हा गाडीबद्दल सुतोवाच केलं होतं. नवी टोटोटा इनोव्हा गाडी हायक्रॉस आहे. आणि एका लीटरला २३ किलोमीटर पर्यंत धावू शकते. अजून या गाडीची किंमत समजू शकलेली नाही. किंवा गाडीचं उत्पादन कधी सुरू होणार हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community