काही दिवसांपूर्वी गुजरातच्या एका शाळेसाठी गणिताचे शिक्षक हवे होते, म्हणून एक जाहिरात बनवण्यात आली होती. मात्र ही जाहिरात गणिताइतकीच रोमांचक होती. यामध्ये फोन नंबर ऐवजी इक्वेशन देण्यात आले होते. हे इक्वेशन सोडवूनच फोन नंबर प्राप्त होणार होता. जर आमचे इक्वेशन सोडवू शकत असाल तरच नोकरीसाठी अर्ज करा असा सरळ अर्थ होता.
आता आणखी एक शालेय जाहिरात समोर आली आहे. यामध्ये तीन शाळकरी मुले आहेत आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले असून अजूनही हा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहे.
@kocharpulkit या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्यांदाच शालेय जाहिरातीत रॅप सॉंगचा वापर करण्यात आला आहे. “Can’t get over this school’s ad. A normal day in Punjab.” असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
(हेही वाचा Mumbai : गोराईतील अनधिकृत बांधकामे हटवून छत्रपती शिवाजी महाराजांचे वॉर म्युझियम साकारणार)
हा जाहिरातीचा धम्माला व्हिडिओ इथे पाहा:
Can’t get over this school’s ad😭😭😭
A normal day in Punjab.Source: insta/playwaysschool pic.twitter.com/TLVhiAN92X
— Pulkit Kochar (@kocharpulkit) May 3, 2023
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी गंमतीदार कमेंट्स केल्या आहेत तर अनेकांनी या शाळकरी मुलांची स्तुती केली आहे. या व्हिडिओतून मुलांचं टॅलेंट तर दिसत आहेच त्याचबरोबर आपल्या शाळेप्रति असलेली आत्मियता देखील दिसून येत आहे. तुम्हाला ही भन्नाट जाहिरात आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.
Join Our WhatsApp Community