कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून सातत्याने लसीकरणासाठी आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी विवध उपाययोजना सुद्धा राबवल्या जात आहेत. पण तरीही काही लोक लसीकरणाचा लाभ घेताना दिसत नाहीत. यावर उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील एका गावाने भन्नाट युक्ती करायचे ठरवले आहे.
ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नाहीत, त्या नागरिकांना पंचायत रेशन देणार नाही, असा आगळा वेगळा निर्णय नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यात मानोरी ग्रामपंचायतीने घेतला आहे. या निर्णयामुळे साहजिकच सर्व नागरिक लसीकरणाला प्राधान्य देतील, यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे हा या मागचा उद्देश आहे.
(हेही वाचाः मुंबईत परिपूर्ण लसवंतांचा आकडा ५० लाखांच्या पार)
दिल्या जाणार नाहीत या गोष्टी
येवला तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे खबरदरीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला नाही, त्या नागरिकांना शासकीय कार्यालयामधून कोणत्याही प्रकारचे दाखले मिळणार नाहीत. तसेच स्वस्त धान्य दुकानातून रेशन सुद्धा दिलं जाणार नसल्याचा निर्णय येवला तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीतील मंडळाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या घेण्यात आला.
१०० टक्के लसीकरण करण्याचा निर्णय
नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे नगर जिल्ह्यात अनेक निर्बंध लावण्यात आले. मानोरी हे गाव याच जिल्ह्याच्या शेजारी असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १०० टक्के लसीकरण करण्याचा निर्णय या गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे.
(हेही वाचाः अखेर राज ठाकरे यांना कोरोनाने गाठले)
Join Our WhatsApp Community