मुंबई महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये सकाळी आणि सायंकाळी महिलांसाठी राखीव सत्रे असून या सत्रांमध्ये महिलांना जलतरणाचा अर्थात स्विमिंगचा आनंद लुटता येतो. परंतु ८ मार्च रोजी साज-या होणा-या महिला दिनाचे औचित्य साधून एक अनोखी भेट मुंबईकर महिलांना देण्याची कार्यवाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत महिलांसाठीच्या सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या महिलांना सभासद शुल्कामध्ये तब्बल २५ टक्क्यांची सूट देण्यात येणार आहे. सध्या असणारे मोठ्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे रुपये १०,१००/- च्या ऐवजी रुपये ७,७००/- इतके होईल. तर छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे ८,००० रुपयांच्या ऐवजी ६,०८० रुपये इतके होईल. याच पद्धतीने त्रैमासिक व मासिक शुल्कातही २५ टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे.
( हेही वाचा : आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी नियुक्ती)
मुंबई महानगरपालिकेचे ४ जलतरण तलाव सध्या कार्यरत आहेत. या चारही जलतरण तलावांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते ६ ही सत्रे केवळ महिलांसाठी राखीव आहेत. या महिलांसाठीच्या सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या महिलांना सभासद शुल्कामध्ये तब्बल २५ टक्क्यांची सूट देण्यास महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. ८ मार्च रोजी साज-या होणा-या महिला दिनाचे औचित्य साधून ही अनोखी भेट मुंबईकर महिलांना देण्याची कार्यवाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांनी दिली आहे.
मुंबईत महानगरपालिकेचे ४ जलतरण तलाव कार्यरत आहेत. या ठिकाणी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सभासदत्व प्राप्त करुन घेता येते. यासाठी जलतरण तलावाच्या प्रकारानुसार शुल्क आकारणी केली जाते. या अंतर्गत वार्षिक शुल्क ८,००० रुपये ते १०,१०० रुपये एवढे आहे. तसेच त्रैमासिक व मासिक सभासदत्वाची सुविधाही उपलब्ध आहे. येत्या दिनांक ८ मार्च रोजीच्या महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठीच्या राखीव सत्रांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणा-या महिलांना २५ टक्क्यांची सवलत लागू करण्यात आली आहे. यामुळे सध्या असणारे मोठ्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे १०,१०० रुपयांच्या ऐवजी ७,७०० रुपये एवढे होईल. तर छोट्या तरण तलावांचे वार्षिक सभासदत्व शुल्क हे ८,००० रुपयांच्या ऐवजी ६,०८० एवढे होईल. याच पद्धतीने त्रैमासिक व मासिक शुल्कात देखील २५ टक्क्यांची सवलत योजना लागू करण्यात आली आहे,अशी माहिती किशोर गांधी यांनी दिली आहे.
या योजनेचे आणखी एक ठळक वैशिष्ट म्हणजे आधीपासून सभासद असणा-या महिलांनाही ही सवलत योजना लागू करण्यात आली आहे. यानुसार इच्छुक महिलांनी तसा अर्ज जलतरण तलाव व्यवस्थापकांकडे दिल्यास त्यांनी पूर्वी भरलेल्या शुल्काचे व उपयोगात आणलेल्या कालावधीचे परिगणन करुन त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात येत असलेल्या या योजनेत नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठीची ऑनलाईन लिंक ही ८ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कार्यान्वित होणार आहे. तरी इच्छुक महिलांनी https.//swimmingpool.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे नाट्यगृह व जलतरण तलावांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी कळविले आहे.
Join Our WhatsApp Community