सध्याच्या काळात आधारकार्ड हे महत्त्वाचे दस्ताऐवज मानले जाते. प्रत्येक गोष्टीसाठी आधारकार्डची आवश्यकता भासत आहे. मग ते कोणतेही सरकारी काम असो किंवा बँकिग कामकाज यासाठी आधारकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे आधारकार्डमधील आपली वैयक्तिक माहिती वेळोवेळी अपडेट करत राहणे ही काळाजी गरज बनली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI कडून आधारबाबत सर्व प्रकारची अपडेट वेळोवेळी नागरिकांना दिली जाते.
(हेही वाचा – एलॉन मस्कचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना थेट मेल, ‘ऑफिसला येणार असाल तर…’)
‘ही’ कागदपत्रेही आधारशी करावी लागणार लिंक
मिळालेल्या माहितीनुसार, आधारशी संबंधित कोणतीही फसवणूक थांबविण्यासाठी आता UIDAI कडून चांगली योजना आणली जात आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने आता जन्म आणि मृत्यू डेटा आधारशी लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गत आता नवजात बालकांना तात्पुरता आधार क्रमांक दिला जाणार असून नंतर तो बायोमेट्रिक डेटासह अपग्रेडही केला जाणार आहे. एवढेच नाही तर मृत्यूची नोंदही आधारकार्डशी जोडली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी आधार क्रमांकांचा होणारा गैरवापर रोखण्यास मदत होणार आहे. आता प्रत्येक व्यक्तीचा जन्म ते मृत्यूपर्यंतचा डेटा बेसमध्ये लिंक केला जाणार आहे, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, जन्म झाल्यानंतर तात्काळ आधार क्रमांकाचे वाटप केल्यास मुलाला आणि कुटुंबाला सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शंभर टक्के खात्री असणार आहे. यामुळे सामाजिक लाभ आणि योजनांपासून कोणताही नागरिक वंचित राहणार माही. त्याप्रमाणे मृत्यू डेटाशी आधार लिंक केल्याने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेचा गैरवापरही टाळता येणार आहे.
Join Our WhatsApp Community