Property in Mumbai : मुंबईचा अनोखा विक्रम; वर्षभरात तब्बल १ लाख २७ हजार १३९ मालमत्तांची विक्री

Property in Mumbai : २०२३ च्या ऑगस्टपासून प्रत्येक महिन्यात मुंबईत १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आहे. डिसेंबरमध्ये एकूण १२ हजार ४८७ मालमत्तांची विक्री झाली आहे. एकट्या डिसेंबरमध्ये राज्य सरकारला ९५२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

191
Property in Mumbai : मुंबईचा अनोखा विक्रम; वर्षभरात तब्बल १ लाख २७ हजार १३९ मालमत्तांची विक्री
Property in Mumbai : मुंबईचा अनोखा विक्रम; वर्षभरात तब्बल १ लाख २७ हजार १३९ मालमत्तांची विक्री

मुंबईतील मालमत्ता विक्री (Property Sales) क्षेत्राने ११ वर्षांतील उच्चांक गाठला आहे. बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाईट फ्रैंक कंपनी याविषयी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. (Property in Mumbai) या आकडेवारीनुसार, या मालमत्तांच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्कापोटी (Stamp duty) राज्य सरकारला एकूण १० हजार ८८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: इस्रायल हमासमधील ओलिस ठेवलेल्या ५० नागरिकांची सुटका करणार, कॅबिनेट वॉर मिटिंगमध्ये निर्णय)

डिसेंबरमध्ये ९५२ कोटी रुपयांचा महसूल

१० वर्षांत प्रथमच राज्य सरकारला मालमत्ता विक्रीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. २०२३ च्या ऑगस्टपासून प्रत्येक महिन्यात मुंबईत १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची विक्री झाली आहे. डिसेंबरमध्ये एकूण १२ हजार ४८७ मालमत्तांची विक्री झाली आहे. एकट्या डिसेंबरमध्ये (December) राज्य सरकारला ९५२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

घरांच्या किंमती ६ ते १० टक्क्यांनी वाढल्या

३ वर्षांपूर्वी कोरोना आणि नंतरच्या काळात घरांच्या विक्री क्षेत्रात मरगळीची स्थिती होती. नंतरच्या काळात गृहनिर्माण उद्योगाला (Housing Industry) मिळालेल्या सवलतींमुळे तेजीची परिस्थिती आली. मुंबईतील घरांच्या किंमती या काळात ६ ते १० टक्के वाढल्या. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, वसई-विरार, पालघर या भागात बांधकामांना वेग येतो आहे.

(हेही वाचा – Waluj Fire Disaster : दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त)

उलाढाल वाढली

गेल्या दीड-दोन वर्षांत व्याजदरात जवळपास अडीच टक्के वाढ झाली. मात्र त्याचा परिणाम मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर (Sale and purchase of properties) झाला नाही, हेच या उलाढालीवरून दिसून येते. घरांच्या किमतीत वाढ झाल्यानंतर खरेदीवर परिणाम होईल, असा अंदाज होता. मात्र आकडेवारी पाहता तो खरा ठरल्याचे दिसून आले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.