विद्यापीठांना दत्तक घ्यावे लागणार पर्यटनस्थळ! देशाचा समृद्ध वारसा, संस्कृतीची माहिती देण्यासाठी विशेष उपक्रम

133

देशातील विद्यार्थ्यांना देशाचा समृद्ध वारसा, संस्कृती, वास्तू, वन्यजीवन माहिती होण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने योजना तयार केली आहे. त्यानुसार विद्यापीठे-उच्च शिक्षण संस्थांना आता पर्यटन स्थळ दत्तक घ्यावे लागणार असून, संबंधित पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, सहली आयोजित करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिले आहेत. शहर, गाव, अभयारण्य किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले एक ठिकाण विद्यापीठाने निश्चित करून दत्तक घ्यायचे आहे. पर्यटन स्थळांची यादी http://www.incredibelindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

( हेही वाचा : कचरा पेट्या मुक्ततेकडून पुन्हा कचरा पेट्यांकडे : सुमारे १६०० कचरा पेट्यांची खरेदी)

संबंधित ठिकाणाच्या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदी उपक्रमांचे वर्षभर आयोजन करावे. तसेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ, संग्रहालय, अभयारण्य, हस्तकला केंद्र अशा ठिकाणी विद्यार्थ्यांची दोन ते तीन दिवसांसाठी अभ्यास सहल आयोजित करावी. त्यासाठी विद्यापीठांनी राज्यातील पर्यटन अधिकाऱ्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी. जेणेकरून संग्रहालयासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क माफ केले जाईल. भेटीनंतरचा अहवाल विद्यापीठाने सादर करायचा आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक आणि योजनेचे संकल्पपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. अभ्यास सहलीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना या पर्यटनस्थळी जाण्यास प्रोत्साहन द्यावे आणि विद्यार्थ्यांनी आपले अनुभव समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करावेत असेही यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.