परकीय मुसलमान आक्रमणकर्त्या मुघलांचा इतिहास यूजीसी ‘पुसणार’!

‘हिस्ट्री ऑफ इंडिया (इसवी सन १२०६ ते १७०७)’ अंतर्गत सांगण्यात येणाऱ्या इतिहासामध्ये आता अकबर आणि मुघलांऐवजी राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे.

90
मागील ७० वर्षे देशभरातील पदवी, पदव्युत्तर इतिहासाच्या अभ्यासक्रमात केवळ मुघल, अकबर या परकीय मुसलमान आक्रमणकर्त्यांचा इतिहास प्राधान्यक्रमाने आणि विस्तृत स्वरूपात देण्यात आला, भारतीय पराक्रमी राजांच्या इतिहासाला मात्र मर्यादित स्थान होते. त्यात आता यूजीसीने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे यूजीसीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात महाराणा प्रताप, सम्राट विक्रमादित्य अशा भारतीय पराक्रमी राजांचा इतिहास विस्तृतपणे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेद, उपनिषदे यांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.

पराक्रमी भारतीय राजांच्या इतिहासाला अधिक महत्व!

यूजीसीने इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा नवीन आराखडा तयार केला आहे. यामध्ये भारतावर आक्रमणे करणारे, हिंदूंची मंदिरे उद्धवस्थ करणारे, हिंदूंचा वंशविच्छेद करणारे, हिंदू महिलांवर अत्याचार करणारे आणि हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मुसलमान आक्रमकांऐवजी भारतीय राजांचा पराक्रमी इतिहास, त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (इसवी सन १२०६ ते १७०७)’ अंतर्गत सांगण्यात येणाऱ्या इतिहासामध्ये आता अकबर आणि मुघलांऐवजी राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे.

वेद, उपनिषदे आणि धार्मिक ज्ञान देणार!

‘आयडिया ऑफ भारत’मध्ये भारतातील राजकीय बाबींऐवजी नव्या अभ्यासक्रमामध्ये धार्मिक बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर नवीन प्रस्तावित अभ्यासक्रम असणार आहे. या माध्यमातून पदवीपूर्वी विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाणार आहे. वैदिक काळातील भारत कसा होता, वेद आणि उपनिषदे यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.