देशात प्रथमच २०२४ पासून देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत पदवीनंतरचा मास्टर्स अभ्यासक्रम (पदव्युत्तर पदवी) (University Grants Commission) आता एक वर्षाचा असणार आहे.
UGCच्या नियामक मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020अंतर्गत तयार केलेल्या पदव्युत्तर कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क मंजूर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थी CUET-PG_2024पासून आवडीच्या संबंधित विषयात पात्रता मिळवू मास्टर्स अभ्यास सुरू करू शकतील. (freedom to choose subjects ) हा मसुदा या आठवड्यात राज्य आणि विद्यापीठांना पाठवला जाणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)चे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी दिली आहे.
नवीन अभ्यासक्रम आणि क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत, चार वर्षांच्या यूजीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचा पर्याय मिळेल. याशिवाय तीन वर्षांचा यूजी प्रोग्राम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा मास्टर्सचा अभ्यास करावा लागेल. याशिवाय नवीन नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे माध्यम बदलण्याचा पर्यायही मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाइन, ओडीएल (दूरस्थ शिक्षण), ऑनलाइन लर्निंग आणि हायब्रीडच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करता येणार आहे.
जर एखाद्या विद्यार्थ्याला मास्टर्समध्ये स्ट्रीम बदलायचा असेल तर तो पर्यायही उपलब्ध असेल. वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या UG विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मास्टर्स करायचे असल्यास, त्यांना त्या विषयात CUET PG 2024 किंवा इतर कोणत्याही प्रवेश प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community