मणिपूरमध्ये गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असलेला जातीय हिंसाचार (Manipur Violence) संपवण्यासाठी केंद्र सरकारला आशेचा किरण दिसू लागला आहे. (UNLF Peace Agreement Manipur) केंद्र सरकारशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर, मणिपूरमधील सर्वांत बंडखोर गट असलेल्या युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (UNLF) बुधवार, 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत कायमस्वरूपी शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्याच वेळी इंफाळ खोऱ्यातील UNLF च्या कार्यकर्त्यांनी शस्त्रांसह सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
(हेही वाचा – NCP Hearing : शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; शरद पवार गटाचे विविध दाखले आयोगापुढे सादर)
यू.एन.एल.एफ.ची शांतता करारावर स्वाक्षरी
गृहमंत्री अमित शहा म्हटले आहे की, ”आपण एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटने (United National Liberation Front) आज नवी दिल्लीत शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे ईशान्येकडे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्याच्या मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला आहे.” गृहमंत्री शाह यांनी त्यांच्या X हँडलवर काही फोटो, व्हिडिओ शेअर केली आहेत, ज्यात सशस्त्र दलातील जवान त्यांची शस्त्रे टाकताना दिसत आहेत.
The peace agreement signed today with the UNLF by the Government of India and the Government of Manipur marks the end of a six-decade-long armed movement.
It is a landmark achievement in realising PM @narendramodi Ji’s vision of all-inclusive development and providing a better… pic.twitter.com/P2TUyfNqq1
— Amit Shah (@AmitShah) November 29, 2023
लोकशाही प्रक्रियेत आपले स्वागत
“मणिपूरमधील सर्वांत जुन्या खोऱ्यातील सशस्त्र गट UNLF ने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्यास सहमती दर्शवली आहे”, असे ट्विट शहा यांनी केले आहे. लोकशाही प्रक्रियेत मी त्यांचे स्वागत करतो. शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर त्यांच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देतो.’
(हेही वाचा – Ajit Pawar : धरमतर, बाणकोट खाडी पुलाला तात्काळ ना-हरकत प्रमाणपत्र द्या; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश)
सशस्त्र चळवळीच्या समाप्तीचे प्रतीक
भारत सरकार आणि मणिपूर सरकारने आज UNLF सोबत केलेल्या शांतता करारामुळे सहा दशकांपासून सुरू असलेल्या सशस्त्र चळवळीचा अंत झाला आहे. सर्वसमावेशक विकासाची पंतप्रधानांची दृष्टी साकार करण्याच्या आणि ईशान्य भारतातील तरुणांना चांगले भविष्य प्रदान करण्याच्या दिशेने ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे, असे अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटले आहे.
UNLF कोण आहे ?
UNLF ची स्थापना 24 नोव्हेंबर 1964 रोजी झाली. त्याचे अध्यक्ष आर. के. मेघन (RK Meghen) उर्फ सना याइमा (Sana Yaima) हे फुटीरतावादी नेते आहेत. मणिपूरला भारतापासून वेगळे करण्याचे त्यांचे षड्यंत्र होते. यासाठी त्यांनी स्वतःची सशस्त्र संघटना स्थापन केली होती, ज्यात मोठ्या संख्येने तरुण, पुरुष आणि स्त्रिया सहभागी होत्या. सरकारशी सततच्या चर्चेनंतर, संघटनेने अखेर शस्त्रे खाली टाकून देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (UNLF Peace Agreement Manipur)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community